सचिन राऊत/अकोला शिक्षणसेवकांच्या १५ हजार जागांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २0१0 साली भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या राज्यातील ३ हजार १३९ शिक्षणसेवकांना परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही नियुक्ती देण्यात येत नसून, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे २ मे २0१0 रोजी शिक्षणसेवकांच्या राज्यातील १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये १0 प्रश्न चुकीचे विचारण्यात आले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार १४ हजार उमेदवारांचे फेरमूल्यांकन करण्यात आले. या फेरमुल्यांकनानंतर राज्यातील ३ हजार १३९ उमेदवार शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरले; मात्र त्यांना २0१0 पासून नियुक्तीच देण्यात आलेली नाही. राज्य परीक्षा परिषदेव्दारा २0१0 मध्ये घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत तीन हजारावर शिक्षण सेवक पात्र ठरले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंजुर पदांपेक्षा जास्त शिक्षक आहेत. त्यामूळे या शिक्षकांचेच समायोजन करण्यास अडचणी येत असल्याची प्रतिक्रिया अकोला जिल्हापरिषदेचे शिक्षणाधिकारी ए. जे. सोनवने यांनी लोकमतशी बोलताना दिली. शिक्षकांना नियुक्ती दिल्यास अतिरिक्त शिक्षकांची वाढेल. याच कारणामूळे पात्र ठरलेल्या शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्यास वेळ लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. *१८ वेळा आंदोलनंशिक्षणसेवक म्हणून पात्र ठरलेल्या ३ हजार १३९ शिक्षणसेवकांना पाच वर्षांपासून नियुक्ती न मिळाल्याने त्यांनी पाच वर्षात १८ वेळा धरणे, आंदोलनं व मोर्चे काढले आहेत; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड आदी जिल्ह्यांमध्ये ही आंदोलनं करण्यात आली होती. *दोघींनी केला आत्महत्येचा प्रयत्न शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. पात्र असतानाही नियुक्ती मिळत नसल्याने त्यापैकी दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, हे उल्लेखनिय.
हजारो शिक्षणसेवकांचे देऊळ पाण्यात!
By admin | Published: December 10, 2014 12:01 AM