जितेंद्र कालेकर - ठाणो
साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण असलेल्या शुभमुहूर्तावर 15 हजार नवीन विविध वाहनांची ठाण्यात खरेदी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेली ही वाहने आता विजयादशमीच्या मुहूर्तावर रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.
दस:याच्या निमित्ताने नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणो या दिवशी अनेक जण नवीन वाहनेही खरेदी करतात. 3 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा आल्याने या दिवशी नवीन वाहन खरेदीसाठी अनेकांनी शोरूम तसेच आरटीओ कार्यालयातून ही प्रक्रिया केली. आधी कर्ज काढणो किंवा वाहन खरेदीसाठी पुंजी जमविण्याचे काम झाल्यानंतर आरटीओ कार्यालयात नोंदणी आवश्यक असते. त्यासाठी 3क् सप्टेंबर 2क्14 र्पयत किमान 14 हजार ठाणोकरांनी नवीन वाहनांची नोंदणी केली आहे. संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या 2क् दिवसांमध्ये ग्राहकांनी 11 हजार विविध वाहनांची खरेदी केली आहे. ऑगस्टमध्ये दुचाकी- तीन हजार 69क्, कार- 12क्9 आणि 445 रिक्षा अशा सहा हजार 351 नवीन वाहनांच्या नोंदी आरटीओ कार्यालयात झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये तीन हजार 758 मोटारसायकली आणि एक हजार 417 कारची नोंदणी झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नोंदणी आणि इतर प्रक्रिया पूर्ण झालेली सुमारे 15 हजार वाहने आता दस:याच्या मुहूर्तावर घरी आणली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली.
साधारण गणोशोत्सव झाल्यानंतर अनेकांना नवीन वाहन खरेदीचे वेध लागतात. परंतु, पितृपक्षात खरेदी होत नसल्याने काही जण केवळ नोंदणी करतात. घटस्थापनेपासून ते नवमीर्पयत सर्वाधिक वाहनांची नोंदणी होते. या काळात दोन हजार 66 मोटारसायकली तर 735 कारची नोंदणी झाल्याची माहिती ठाणो उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी लोकमतला दिली.
4खरेदीची आणि नोंदणीची प्रक्रिया आधीच केली जाते पूर्ण फक्त वाहनाचा ताबा घेऊन ते रस्त्यावर आणण्याचे तेवढे बाकी ठेवले जाते. दस:याचा शुभ मुहूर्त साधून ते त्या वेळी पूर्ण
केले जाते.