शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

इच्छुकांकडून संक्रांतीसाठी लाखोंचे वाण

By admin | Published: January 17, 2017 2:07 AM

आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने मतदार संख्याही वाढली आहे.

चिंचवड : आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने मतदार संख्याही वाढली आहे. संक्रांतीचेनिमित्त साधून मतदारांपर्यंत जाता यावे म्हणून इच्छुक उमेदवारांनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने लाखो रुपयांचे ‘वाण’ भेटवस्तू म्हणून मतदारांना वाटप केले जात आहे. त्यामुळे मतदार राजा तर खूश आहेच, पण व्यापाऱ्यांनाही नोटाबंदीनंतर प्रथमच सुगीचे दिवस आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात ३२ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या साधारण ३० ते ३५ हजार आहे. त्यामुळे इच्छुकांकडून सर्व मतदारांना भेटणे अशक्य आहेत. त्यामुळे मकर संक्रातीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेऊन वाण वाटपाद्वारे मतदारांना प्रलोभने दाखविली जात आहेत. कमीत कमी ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांच्या वस्तू एक गठ्ठा खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे इच्छुकांनी वाण वाटपासाठी एकावेळी १० ते १५ हजार वस्तू खरेदी केल्यामुळे व्यापा-यांकडून सवलती दिली जाते. नोटाबंदीनंतर प्रथमच व्यापा-यांना या वस्तु खरेदीमुळे दिलासा मिळू लागला आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या वस्तू कार्यकर्त्यांमार्फत अथवा घरोघरी जाऊन छुप्या पध्दतीने वाटल्या जात आहेत. मकर संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंतचा मुहूर्त वाण वाटपासाठी आहे. त्यामुळे महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन वाण वाटपाचे नियोजन केले जात आहे. साधारण एका पक्षातील विद्यमान नगरसेवकांनी प्रभागातील इच्छुक सहका-यांला घेऊन एकत्रितपणे कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हे सर्व करीत असताना आचारसंहितेचा त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. (वार्ताहर)>आकर्षक, महागड्या भेटवस्तूमकर संक्रातीच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने महिलांना आकर्षित व घरगुती वापराच्या भेटवस्तू दिल्या जात आहेत. कुंकवाचे करंडे, घरगुती वापराची भांडी, पैठणी, तांबे, पातले, डीनर सेट आदींचे वाण म्हणून वाटले जात आहेत. प्रभागातील महिला ही सर्वच इच्छुक उमेदवारांच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्यासाठी रांगा लावत असल्याचे चित्र शहरात फिरताना दिसत आहे.