लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होत असताना, गुडलक चौक ते संभाजी महाराज पुतळ्यादरम्यान बेकायदा जमाव जमवून ध्वनीक्षेपकावर घोषणा दिल्याप्रकरणी सांगलीच्या शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह संजय जडर, पराशर माने, अविनाश मरकळे आणि रावसाहेब देसाई तसेच हजार कार्यकर्त्यांविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी फिर्याद दिली आहे. पालखी सोहळा आज पुण्यातून मार्गस्थ होणारजगदगुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात विसावल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली आहे. हा सर्व परिसर वारकरी बांधव व दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता.या ठिकाणी खाद्यपदार्थांपासून ते लहान मुलांची खेळणी, स्वयंपाकघरातील वस्तू, महिलांची सौंदर्यप्रसाधने, दागिने आदी वस्तूंच्या दुकानांनी परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते.
संभाजी भिडे यांच्यासह हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा
By admin | Published: June 20, 2017 1:41 AM