मुंबई : गेल्या महिन्यात 30 जूनच्या मध्यरात्री प्रसिद्ध ताज महाल पॅलेस हॉटेलला धमकीचे दोन फोन आले होते. एका पाठोपाठ एक आलेल्या या फोनवरून हॉटेलवर पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर ए तोयबाचा हस्तक असल्याचे सांगितले होते. आता याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा खोडसाळपणा करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पहिला फोन -हॉटेल ताज महल पॅलेसच्या फ्रन्ट ऑफिसला 30 जूनच्या मध्यरात्री साधारणपणे 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हे फोन कॉल आले होते. यावर "मै लष्कर ए तोयबा से बोल रहा हु, मेरा नाम सुलतान है," असे सांगण्यात आले आणि फोन कट करण्यात आला. यानंतर तेथील टेलिफोन ऑपरेटरने सर्व प्रकार हॉटेलच्या सुरक्षा विभागाला कळवला.
दुसरा फोन -यानंतर पुन्हा चार मिनिटांनी त्याच मोबाईल नंबरवरून फोन आला. यावेळी हा फोन सुरक्षा एक्झिक्युटीव्हला जोडण्यात आला. यावर संबंधित व्यक्तीने धमकी दिली, की "मै सुलतान बोल रहा हुँ. मै लष्कर ए तोयबा से हुँ और मै पाकिस्तान से बोल रहा हुँ. हॉटेल ताज पे जो पहीले अॅटॅक हुआ था, वैसाही अॅटॅक हम फिर से करनेवाले है और हम इसकी प्लानिंग बहोत जल्द करनेवाले है." एवढे बोलून फोन कट करण्यात आला.
या फोन कॉलनंतर, तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर हॉटेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पोलिसांनी आता दूरध्वनीवर बोलणाऱ्या सुरक्षा एक्झिक्युटीव्हचा जबाब नोंदवला आहे. यावरून पोलिसांनी भादंवि कलम 505(1)(ब), 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
खोडसाळपणाचा संशय -पोलीस संबंधीत मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने अधिक तपास करत आहेत. मात्र, हा प्रकार एक खोडसाळपणा असल्याचा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश
चीन सीमेवर तणाव वाढतोय, पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; अर्धातास चालली चर्चा
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?
CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!