पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना धमक्या मिळत असतील, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी राज्य शासनाला केला.डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २८ महिने कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला १० महिने पूर्ण झाली, तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नसल्याच्या निषेधार्थ अंनिसच्या वतीने महर्षी विठठ्ल रामजी शिंदे पुलावर निदर्शने करण्यात आली. या वेळी हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, शहाजी भोसले, श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अविनाश पाटील म्हणाले, की दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खुनांच्या घटनांमध्ये अनेक साम्यस्थळे असल्याचे पुरावे समोर येत असूनदेखील तपास यंत्रणांच्यामध्ये पुरेसा समन्वय दिसून येत नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी याविषयी दिशाभूल करणारे केलेले विधान अजूनही मागे घेतलेले नाही.हमीद दाभोलकर म्हणाले, की डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुनासा तपास गतिमान करण्यासाठी ठोस मागण्यांचे पत्र राज्य शासनाला देण्यात आले आहेत.
सीबीआय अधिकाऱ्याला धमकी, सामान्यांचे काय?
By admin | Published: December 21, 2015 12:55 AM