मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर एक निनावी फोन आला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगचा हस्तक असल्याचे या अज्ञात व्यक्तीने सांगितले. तसेच, त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही, अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दरम्यान, या फोनबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत, असेही अनिल परब यांनी सांगितले.
याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेतला जातो. तो अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आलेला असल्याचेही अनिल परब यांनी सांगितले. दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन आल्याची माहिती आहे. मात्र, यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.
दरम्यान, निनावी फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. सध्या सायबर पोलीस या फोन कॉल्सची तपास करत आहे. याचबरोबर, हा फोन दाऊदच्या गँगकडून आला आहे की अन्य कोणी खोडसाळपणा केला? याचाही तपास केला जात आहे. जर कोणी तसा खोडसाळपणा केला असेल तर त्याचीही गय केली जाणार नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.
आणखी बातम्या...
- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप
- राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना
- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला
- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान