मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुंबईतील मुख्यालयात यासंदर्भात एक ईमेल आल्याचे सांगितले जात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सीआरपीएफच्या मुख्य कार्यालयाला मंगळवारी हा ईमेल आला. (threatening to kill amit shah and yogi adityanath)
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कोणत्या तरी धार्मिक स्थळी हल्ला करण्यात येणार असल्याचा ईमेल सीआरपीएफच्या मुख्य कार्यालयाला आला. हा ईमेल मिळाल्यानंतर संपूर्ण विभागात खळबळ माजली. सीआरपीएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, याचा शोध घेण्यात येत आहे.
अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याचा ईमेल काही दिवसांपूर्वी आला होता. याबाबत अन्य तपास यंत्रणा, संस्था यांना माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती सीआरपीएफ सूत्रांकडून देण्यात आली आहे. यापूर्वीही या दोन्ही बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
बाबा... तुम्ही लवकर घरी या! नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता जवानाच्या मुलीची आर्त साद
दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही जीवे मारण्याची धमकी यापूर्वी अनेकदा मिळाली होती. जानेवारी २०२१ मध्ये धमकी मिळाली होती. पुढील २४ तासांत योगी आदित्यनाथ यांना ठार करू. हिंमत असेल, तर शोधून दाखवा. एके-४७ घेऊन योगी आदित्यनाथ यांना ठार मारले जाईल, अशी धमकी मिळाली होती. काही तासांत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.