मुंबई : भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बांगलादेशातील एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस तपास करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चेन्नई येथे पोस्टिंग असलेल्या वानखेडे यांना सोमवारी एका इन्स्टाग्राम युझरकडून थेट संदेश आला.
ही व्यक्ती बांगलादेशातील राणीगंज येथील असल्याचा दावा करत होती. युझरने वानखेडेंना अपशब्द वापरले. त्यानुसार वानखेडे यांनी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना ई-मेल लिहिला. आता गोरेगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून एफआयआरही नोंदविल्याचे समजते.