पुणे : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या दिल्या जात आहेत. एका धर्मगुरू ला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून तुम्ही समजता कोण स्वत:ला? तुम्ही चांगले केले नाहीत. तुम्ही खूप मोठी चूक केली असल्याचे सुनावले जात आहे. संमेलनापूर्वीच संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद चिघळायला सुरूवात झाली आहे.संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. समाजातूनही साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर टीकेची झोड उठत आहे. मात्र आता महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या देणा-यापर्यंत विरोधकांची मजल पोहोचली आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्णह्णशी बोलताना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, ह्यफादरह्ण यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशा आशयाचे ठाणे, मुंबई, नागपूर अशा विविध ठिकाणाहून जवळपास 100 दूरध्वनी आले आहेत. त्यांना ती व्यक्ती मातृभाषेत साहित्य लेखन करते किंवा ते लेखक आहेत याविषयी काहीदेणे घेणे नाही. त्यांचे दुखणे हे केवळ धार्मिक आहे. फक्त दिब्रिटो यांची निवड का केली?असा सवाल केला जात आहे. केवळ ते ख्रिश्चन असल्यानं विरोध केला जातोय. दरम्यान, अशाप्रकारच्या धमक्या येत असण्याला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, काही लोक वैयक्तिक आणि परिषदेतही फोन करून अत्यंत अर्वाच्य भाषेत व उर्मटपणे 'तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला संमेलनासाठी काय परदेशातून पैसा आला का? ' अशी दमदाटी करीत आहेत. तरीही आम्ही सौम्यपणे ते फोन स्वीकारत आहोत. व्यक्त होण्याची एक भाषा असते. त्या सीमा ओलांडल्या जात आहेत, याचे दु:ख होत आहे.----------------------------------------------------------------------------------------------साहित्य संमेलन निधर्मी असते. अध्यक्ष निवडताना कधीच धमार्चा विचार केला जात नाही. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिला आहे. धमक्याबद्दल आम्ही तक्रार करणार नाही. आमची काळजी सरकार व गृहमंत्री घेतील. पदाधिका-यांना आलेल्या धमक्याचा प्रकार त्यांना कळला आहे. लोकशाहीत निवड प्रक्रियेला महत्त्व आहे. त्यामुळे एकदा निवड झाल्यानंतर ती मागे घेता येत नाही.- प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांसह मसापच्या कार्याध्यक्षांना धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 5:18 PM
संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
ठळक मुद्दे संमेलनापूवीर्ची वादाची किनार