पुणे : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा या तिघांना बेंगळुरू येथून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात पुणे येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात येणार आहे. तीनही आरोपी सध्या बेंगळुरू येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सीबीआयला तिघांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी मिळाली आहे. तीनही आरोपी हे सचिन अंदुरे याच्याशी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संर्पकात होते. दाभोलकर प्रकरणातील दोन हल्लेखोरांनी शस्त्रांचे प्रशिक्षण कुठे घेतले, त्यांना शस्त्रे कोणी पुरवली, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल कुठे लपवून ठेवली आहे, याबाबत चौकशी करावयाची आहे. गुन्हयात वापरलेली मोटारसायकल, शस्त्रे कुठे विल्हेवाट लावण्यात आली याबाबत अंदुरे याच्याकडे सखोल तपास करण्यात येत आहे. अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा तिघांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याची बाब सीबीआयने केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लंकेश आणि डॉ. दाभोलकर हत्येचे कनेक्शन यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता आहे. शरद कळसकरची कोठडी संपल्यानंतरच त्याला दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयात हजर करणे शक्य होणार आहे.
गौरी लंकेश हत्येतील तीन आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 9:44 PM
तीनही आरोपी सध्या बेंगळुरू येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सीबीआयला तिघांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी मिळाली आहे.
ठळक मुद्देलंकेश आणि डॉ. दाभोलकर हत्येचे कनेक्शन यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता शरद कळसकरची कोठडी संपल्यानंतरच न्यायालयात हजर करणे शक्य होणार