मुंबई : शिवडी गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हनिफ शेख (२२), सुशील ऊर्फ अतुल टेके (२४) , अखिलेश मिश्रा (४३) अशी अटक आरोपींचे नाव आहेत. पैशांच्या वादातून बुधवारी रात्री सुशांत ऊर्फ बंटी घोडेकरची या त्रिकूटाने हत्या केली. चौघेही एकाच परिसरात राहण्यास होते. कॉटन ग्रीन परिसरात उभ्या असलेल्या वाहनचालकांकडून ही टोळी पैसे उकळत होती. हाच पैशांचा वाद मिटविण्यासाठी बुधवारी या त्रिकूटाने बंटीला भेटण्यासाठी बारमध्ये बोलविले. दारू पीत असताना सुशांतसोबत त्यांची बाचाबाची झाली. याचे रूपांतर भांडणात झाले. त्रिकूटाने त्याला मारहाण करीत त्याच्यावर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत बाहेर मदतीसाठी याचना करणाऱ्या बंटीवर अखिलेशने तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिघांनीही पळ काढला. शुक्रवारी हे तिघेही परदेशात निघून जाण्याच्या तयारीत होते. तिघांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत खून, जबरी चोरी, मारहाणीसारख्या गुन्ह्यांची नोंदआहे. (प्रतिनिधी)
शिवडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक
By admin | Published: July 23, 2016 4:43 AM