सीसीटीव्हीवरील फुटेजच्या आधारे लागला छडाठाणे : वागळे इस्टेट येथील एका किराणा दुकानातून दोन लाख 1क् हजारांचा ऐवज चोरणा:या त्रिकुटाला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सीसीटीव्हीवरील फुटेजच्या आधारे त्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड केली.
चैतन्य ऊर्फ चेतन नरसिलू कालू (17), राजेश मदन सिंग (16) आणि आवेश शरीफ शेख (19, रा. तिघेही रूपादेवीपाडा, वागळे इस्टेट, ठाणो) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वागळे इस्टेट भागातील ह्यआशीर्वाद जनरल स्टोअर्सह्ण हे दुकान फोडून चोरटय़ांनी दोन लाखांचा ऐवज लंपास केला होता.
याबाबत, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि हवालदार जीवन नाईक यांनी त्याच दुकानासमोरील सीसीटीव्हीची तपासणी केली. खब:यांच्या मदतीने त्यातील आरोपींचा ठावठिकाणा शोधला. तेव्हा एका दारूच्या दुकानातही याच त्रिकुटाने यापूर्वी चोरी केल्याचे उघड झाले. त्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या पथकाने तिघांना अटक केली. त्यांना वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर करीत आहेत.