ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. २ : बिलोली तालुक्यातील बोळेगाव लगत मांजरा नदीपाञात ३ नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ते मांजरा नदीपात्रात जिवंत वाहून आले असून बोळेगाव नदीपात्राच्या काठात सदर व्यक्ती दिसत आहेत. या ठिकाणी पोलिस प्रशासन व तहसिल प्रशासन अधिकारी आले असून काही वेळात हेलिकाँप्टर च्या सहाय्याने पात्रात अडकलेल्या व्यक्तींना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुभाष साबणे यांनी दिली आहे.सदर घटनेच्या ठिकाणी बिलोली चे उपविभागीय अधिकारी , नायब तहसिलदार , पोलिस प्रशासन , पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून मांजरा नदीपात्रात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे