शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

निसर्गही कन्फ्युज! राज्यात तीन दिवस उष्णतेची लाट, त्यातच पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 5:32 AM

उन्हाळ्यातील तीन महिन्यांत मुंबई, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे एकूण तीन महिन्याच्या सरासरीइतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मार्च उजाडतानाच मुंबईसह राज्याला उन्हाचे चटके बसू लागले असून, पुढील ७२ तासांसाठी मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी ४ ते ६ मार्चदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली.

राजस्थान तसेच दक्षिण पाकिस्तानदरम्यानच्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे ४ मार्चपासून पुढील ५ दिवस मुंबई, ठाणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यातील पावसाच्या सरी मार्चच्या पावसाच्या सरासरीपेक्षा कमी असण्याची आणि उर्वरित जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे, असे  निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. ४, ५, ६ मार्च असे ३ दिवस महाराष्ट्रात असह्य उष्णतेची काहिली जाणवू शकते. त्यानंतर कमाल तापमानात घसरण होऊ शकते,असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे मार्चच्या सरासरी इतके, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल. संपूर्ण उन्हाळ्यात पहाटेचे किमान तापमान सोलापूर, मराठवाडा, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ  जिल्ह्यात तीन महिन्यांच्या सरासरी इतके, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल.

मार्चपासूनच उष्णतामार्च महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग व नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी किंवा त्यापेक्षा खाली असण्याची शक्यता आहे.उन्हाळ्यातील तीन महिन्यांत मुंबई, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे एकूण तीन महिन्याच्या सरासरीइतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातRainपाऊस