शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने स्फोट करणारे तिघे अटक

By admin | Published: August 01, 2016 10:57 PM

प्रेमाला विरोध केल्यामुळे धारदार शस्त्रास्त्राने हत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, भावाच्या प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या अभिजित घरत याचा काटा काढण्यासाठी डिटोनेटरचा

पडघ्यातील घटना : डिटोनेटरद्वारे घडवला धमाकाठाणे : प्रेमाला विरोध केल्यामुळे धारदार शस्त्रास्त्राने हत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, भावाच्या प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या अभिजित घरत याचा काटा काढण्यासाठी डिटोनेटरचा स्फोट घडवून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली. हा अजब प्रकार पडघ्यात २८ जुलै रोजी घडला होता. प्रमोद प्रभाकर दळवी (२५, रा. खालिंग, ता. भिवंडी), सिद्धेश प्रभाकर दळवी (२० रा., खालिंग) आणि रोशन गणेश शेलार (१९, रा. दळेपाडा, ता. भिवंडी) अशी अटक केलेल्या तीन कथित आरोपींची नावे आहेत. २६ जुलै रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास खालिंग येथील अभिजित घरत याच्या पडघा बाजारपेठेत उभ्या केलेल्या मोटारसायकलच्या हॅण्डलच्या पिशवीत एक गिफ्ट पॅकेट ठेवले होते. त्यावर ‘अभिजित घरतसाठी स्पेशल गिफ्ट, बाटलीचे झाकण उघड’ असे लिहिले होते. त्या दिवशी अभिजित ते घरी घेऊन गेला. मात्र, त्या गिफ्टला उग्र वास आल्याने त्याने ते घराच्या एका कोपऱ्यात ठेवले. त्या गिफ्टला हात लावू नकोस, असेही त्याने आपल्या आईला सांगितले होते. मात्र, २८ जुलै रोजी रात्री ८.३० वा.च्या सुमारास उत्सुकतेपोटी अभिजितची आई रेखा घरत यांनी गिफ्टचे झाकण उघडले, त्याबरोबर झालेल्या स्फोटामुळे त्यांच्या हातावर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात ३० जुलै रोजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. एका गिफ्टच्या पॅकेटच्या नावाखाली थेट जिलेटनचा स्फोट झाल्यामुळे दशतवादविरोधी पथकासह आयबी आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांनीही पडघ्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. पोलीस अधीक्षक डॉ. पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. खालींग गावातील प्रसाद शेलार याचे एका मुलीबरोबर गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याच मुलीबरोबर प्रमोद दळवी याचेही प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते. प्रसाद आणि अभिजित (ज्याला गिफ्ट पाठवून मारण्याचा कट रचण्यात आला) जवळचे मित्र आहेत. दोन महिन्यांपूर्वी अभिजित आणि प्रसाद यांनी प्रमोदला बोलावून ‘ तू त्या मुलीचा नाद सोड, असे म्हणून अभिजितने त्यास ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कक पुकळे यांना मिळाली होती. याच माहितीमुळे पुढे या प्रकरणाचा उलगडा झाला.प्रमोदने धमकीचा हा प्रकार आपला भाऊ सिद्धेशला सांगितला. प्रेमप्रकरणात आड येणाऱ्या प्रसादमुळे अभिजितने आपल्या भावाला धमकविल्याचे सिद्धेशच्या चांगल्याच जिव्हारी लागले. त्यानंतरच सिद्धेश, प्रमोद आणि रोशन या तिघांनी अभिजितला मारण्याचा कट रचला. परंतू, त्यात तो बाहेर असल्यामुळे तो सुदैवाने यातून बचावला.मात्र त्याची आई यात निष्कारण होरपळली गेली.सुतळी बॉम्बच्या दारूचा वापरघरातील सुतळी बॉम्बची दारू वापरून स्वीचच्या साहाय्याने बाटलीत हा बॉम्ब तयार केला. सिद्धेशचा मित्र रोशन शेलार यानेही बॉम्ब बनवण्यासाठी मदत केली. २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास सिद्धेशने हा बॉम्ब काळ्या पिशवीत टाकून अभिजितच्या मोटारसायकलला ती पिशवी लावली होती, अशी माहिती चौकशीत उघड झाल्यामुळे वरील तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.आठवी नापास असूनही थेट स्फोटापर्यंत मजलस्फोट घडवणारा सिद्धेश हा आठवी नापास आहे, तर प्रमोदने आयटीआय केले आहे. केवळ अभिजितला धडा शिकवायच्या इराद्याने त्यांनी या स्फोटाची शक्कल लढवली. त्यासाठी मासेमारी करणाऱ्या एका मित्राकडून डिटोनेटर मिळवले. जंगलात या स्फोटाची चार ते पाच वेळा चाचणीही केली होती.