शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहात पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
6
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
7
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
8
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
9
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
10
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
11
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
12
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
13
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
14
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
15
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
16
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
17
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
18
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
19
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
20
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

तीन जिल्हा बँका संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 12:42 AM

थकीत कृषीकर्जाच्या बोजामुळे विदर्भातील तीन जिल्हा सहकारी बँका आणखी संकटात सापडल्या आहेत. या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या छत्रछायेत आहेत.

- सोपान पांढरीपांडे,  नागपूरथकीत कृषीकर्जाच्या बोजामुळे विदर्भातील तीन जिल्हा सहकारी बँका आणखी संकटात सापडल्या आहेत. या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या छत्रछायेत आहेत.या बँका म्हणजे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. यापैकी नागपूर व वर्धा बँकाचे बोर्ड, होम ट्रेड रोखे घोटाळ्यात अनुक्रमे १२४.६० कोटी व ३० कोटी नुकसान झाले म्हणून २००२ साली बरखास्त झाले आहे. बुलडाणा बँकेचे बोर्ड अनियमिततेमुळे बरखास्त झाले आहे.नागपूर जिल्हा बँकेचे एकूण कर्जवाटप ६६६.७७ कोटी आहे. त्यापैकी थकीत कृषी कर्ज ४८२.३० कोटी आहे. वर्धा बँकेचे एकूण कर्ज ३१९.७२ कोटी आहे व त्यापैकी थकीत कृषी कर्ज २४३.१० कोटी आहे तर बुलडाणा बँकेचे एकूण कर्ज ४९४.५५ कोटी व थकीत कृषी कर्ज ३६१.६७ कोटी आहे.दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने या बँकांना लायसन्स देण्याचे नाकारले म्हणून राज्य व केंद्र सरकारने नाबार्डमार्फत या बँकांना आर्थिक मदत दिली होती. यामध्ये नागपूर बँकेला १५६ कोटी, वर्धा बँकेला १६१ कोटी व बुलडाणा बँकेला २०६ कोटी मिळाले होते. त्यामुळे या बँकांना लायसन्स मिळाले; पण कर्जवसुली अभावी परिस्थिती सुधारली नाही. आजही बँकांना भांडवल निधीची पूर्तता करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यात नागपूर बँकेला ५० कोटी, वर्धा बँकेला १२० कोटी तर बुलडाणा बँकेला ७० कोटींची गरज आहे. सरकारने ही २४० कोटींची मदत या बँकांना त्वरित करावी अन्यथा आधी मिळालेले ५२३ कोटी पाण्यात जातील, अशी भीती सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.मात्र कर्जमाफीमुळे या तीनही बँका आपोआप संकटमुक्त होणार आहेत. या सर्व बँकांचे कृषी कर्ज सेवा सहकारी संस्थांकडे अडकून पडले आहे. कर्जमाफी झाली तर सेवा सहकारी संस्थांना कर्जमाफीची रक्कम मिळेल व नंतर ती जिल्हा बँकांना कर्जफेड म्हणून मिळेल. अशा तऱ्हेने कर्जमाफीमुळे या तीनही जिल्हा बँका संकटमुक्त होतील.