शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

महापालिकेचे तीन अभियंते निलंबित

By admin | Published: July 30, 2015 3:11 AM

नाशिक रोड विभागात जुने पथदीप काढून ते विविध ठिकाणी बसविण्याच्या कामात झालेली अनियमितता आणि मक्तेदाराशी संगनमत करतानाच वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या महापालिकेच्या

नाशिक : नाशिक रोड विभागात जुने पथदीप काढून ते विविध ठिकाणी बसविण्याच्या कामात झालेली अनियमितता आणि मक्तेदाराशी संगनमत करतानाच वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या महापालिकेच्या विद्युत विभागातील एका उप अभियंत्याबरोबरच दोन कनिष्ठ अभियंत्यांना आयुक्तांनी निलंबित केले आहे. विद्युत विभागातील उप अभियंता वसंत गोपाळराव लाडे, कनिष्ठ अभियंता कृष्णा बाबूराव जगदाळे आणि मोहन विजयराव गिते या तीन अभियंत्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई करत त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. नाशिक रोड विभागातील जेल रोड येथील प्रभाग क्रमांक ३२ मध्ये जुने पथदीप काढून ते विविध ठिकाणी बसविण्यासंबंधी आठ लाख ९२ हजार ८५० रुपये खर्चाचे काम तिलोत्तमा इलेक्ट्रिकल्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग सर्व्हिसेस या मक्तेदारास देण्यात आले होते. सदर काम २८ मे २०१४ रोजी पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु काम पूर्ण होण्यापूर्वीच कामाच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेतल्याची बाब सकृतदर्शनी प्रशासनाच्या निदर्शनास आली. याशिवाय मुदतीत काम पूर्ण न केल्याने मक्तेदारास होणाऱ्या दंडनीय कारवाईतून वाचविण्यासाठी संगमनत करण्यात आले आणि त्याला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सदर प्रमाणपत्रावर दिनांक तसेच मोजमाप पुस्तिकेवर तपासणी अधिकाऱ्याची स्वाक्षरीही दिनांकीत नसल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर वरिष्ठांची दिशाभूल करून बिल लेखा विभागाकडे सादर करण्यात आले. प्रभाग ३४ मधील आठ लाख ९८ हजार ९७० रुपयांच्या कामातही अनियमितता आढळून आली.