औरंगाबाद : दुष्काळ व कर्जास कंटाळून जालना व बीड जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.माजलगाव (जि.बीड) तालुक्यातील नित्रुड येथील तुकाराम रामिकसन जाधव (३१) या शेतकऱ्याने रविवारी विषारी द्रव प्राशन केले होते. त्याचा सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुकाराम जाधव यांची दीड एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून अनियमित पावसामुळे पिके आली नव्हती. त्यामुळे कर्जाचा डोंगर त्यांच्या समोर उभा होता.जाफराबाद (जि.जालना) तालुक्यातील पिंपळखुटा येथील गणेश परसराम दुनगहु (२०) या शेतकऱ्याने मंगळवारी पहाटे शेतातील गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश दुनगहु यांच्यावर बँकेचे साडेचार लाख रुपयांचे कर्ज होते. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबिनचे पिक हातचे गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. घनसावंगी (जि.जालना) तालुक्यातील तिर्थपुरी येथील सतीश बाबूराव डांगे (३२) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे सोमवारी सायंकाळी विषारी द्रव सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.बुलडाण्यातही आत्महत्यासंग्रामपूर तालुक्यातील आडोळ बु. येथील शेतकरी दगडू गेंडुजी अजने(४८) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याकडे चार एकर शेती होती. त्यांच्यावर पिंपळगाव काळे येथील बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे.
मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: September 23, 2015 12:59 AM