कळंब (उस्मानाबाद)/ हिंगोली : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. कळंब तालुक्यातील खेर्डा येथील गुरुलिंग खराडे (५२) यांनी मंगळवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. यंदा आधी पावसाने ओढ दिल्याने तर नंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. याच विवंचनेतून त्यांनी मंगळवारी मध्यरात्री घरासमोरील जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, असा परिवार आहे.हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील विष्णू पंडित (३५) या शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्यावर एक लाखाचे कर्ज होते. रोजगार नसल्याने कर्जफेडीच्या चिंतेने बुधवारी दुपारी विष्णू यांनी विषप्राशन केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. औंढा नागगनाथ तालुक्यातील चिंचोली (निळोबा) येथे हिराजी मोरे (४५) यांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून सोमवारी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)विदर्भात शेतकऱ्याची आत्महत्याराळेगाव (यवतमाळ) : अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील वाल्मिक चंपतराव डहाके (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोसायटीचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.
मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: September 29, 2016 12:55 AM