नांदेड : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून नांदेड जिल्ह्णात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले आहे़ यामध्ये शानिक शिवाजी कदम (३०) व मारोती हुलाजी सूर्यवंशी (६०), राघोजी आनंदा पुयड (५०) यांचा समावेश आहे़ कदम यांच्यावर हदगावच्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेचे ८० हजारांचे कर्ज होते़ उत्पन्न होत नसल्याने त्यांनी यावर्षी दोन बोअर शेतात घेतले़ परंतु दोन्ही बोअर कोरडे गेल्याने त्यांना नैराश्य आले होते़ यावर्षी जूनमध्ये कापूस, सोयाबीनची पेरणी केली़ परंतु पावसाने १५ दिवसांपासून उघडीप दिल्याने सोयाबीन करपून गेले़ ८ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास त्यांनी घरातील उंदिर मारण्याचे किटकनाशक प्राशन केले़ त्यांना तत्काळ नांदेडच्या खाजगी व नंतर शासकीय दवाखान्यात नेण्यात आले़ उपचारादरम्यान त्यांचा सकाळी मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे़सूर्यवंशी यांच्याही नावावर ग्रामीण बँकेचे कर्ज होते़ पावसाअभावी शेतातील पीक वाळून गेल्यामुळे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे म्हणून त्यांनी ८ जुलै रोजी सायंकाळी शेतात जावून विषारी औषध प्राशन केले़ यातच त्यांचा मृत्यू झाला़ पिंपळगाव (मि़) ता़नांदेड येथील राघोजी आनंदा पुयड यांनी सोयाबीनचे पीक वाया जाणार या भीतीपोटी गळफास लावून आत्महत्या केली़ दुबार पेरणीची चिंता त्यांना होती़ (प्रतिनिधी)
नांदेडमध्ये तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: July 10, 2015 2:38 AM