नागपूर : तीन अपत्यांना जन्म देणा-या महिला उमेदवाराला नागपूर खंडपीठाने सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरविले आहे. अनिता रहांगडाले असे त्यांचे नाव असून, त्या ठाणेगाव, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथील रहिवासी आहेत.१२ सप्टेंबर २०११ नंतर तिस-या अपत्याला जन्म दिल्यामुळे त्यांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यातील कलम १४(१)(जे-१)अंतर्गत रद्द केले होते. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने ५ आॅक्टोबर रोजी रहांगडाले यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा अंतरिम आदेश देऊन, याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास मनाई केली होती. त्यानंतर, निवडणूक झाली, पण या आदेशामुळे निकाल थांबवून ठेवण्यात आला होता. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, रहांगडाले यांना निवडणुकीसाठी पात्र ठरवून निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.रहांगडाले यांनी ७ आॅगस्ट २००४ रोजी पहिल्या, तर १९ जून २००७ रोजी दुसºया अपत्याला जन्म दिला. दुसºया अपत्याचा २ आॅगस्ट २००८ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर, त्यांनी १९ जुलै २००९ रोजी तिसºया अपत्याला जन्म दिला. या प्रकरणात दोनपेक्षा जास्त अपत्ये एकाच वेळी कधीच हयात नव्हती. त्यामुळे रहांगडाले निवडणुकीसाठी पात्र ठरल्या.
तिघांची जन्मदात्री निवडणुकीसाठी पात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 3:59 AM