शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 3:16 AM

भार्इंदर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

मीरा रोड : भार्इंदर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. एक आरोपी फरार आहे. बलात्कार व हत्या करणारा मुख्य आरोपी मुलीच्या वडिलांकडे कामाला होता. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर ३० तासांत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला, असे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे हत्येनंतरही आरोपी कुठेही पळून न जाता त्याच भागात राहत होते.भार्इंदर पूर्वेच्या आझादनगरमध्ये राहणारी चार वर्षांची मुलगी हुमेरा महिर्बुरजा कुरेशी घराबाहेर खेळत असतानाच बेपत्ता झाल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी सायंकाळी नाल्यात मांजरमाती खणत असल्याचे पाहण्यास गेलेल्या दोघा मुलांना मातीच्या बाहेर आलेला हाताचा पंजा व पायाची बोटे दिसली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो हुमेराचा होता. याप्रकरणी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, नवघरचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रफुल्ल वाघ तपास करत होती. जे.जे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या चौकशीतून त्याच भागात राहणारा मोहम्मद युनूस हाजी महमद बशीर शहा ऊर्फ झीरो ऊर्फ झीरू (२४) याला ताब्यात घेतले. चौकशीत युनूसने चॉकलेटच्या बहाण्याने हुमेराला उचलून नेले. चॉकलेट दिल्यावर तिला निर्जन नाल्याजवळ घेऊन गेला. तेथे मोहम्मद रोजान इसहाक राईनी ऊर्फ लंगडा (३८), जितेंद्र ऊर्फ जितूू तीर्थप्रसाद राव (३२) व राजेश हे आधीपासूनच होते. युनूसने तेथेच त्या चिमुरडीवर अत्याचार केला. ती मोठ्याने रडू लागल्याने युनूसने तिचे नाक व तोंड दाबले व तिच्यावर वार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. ती मरण पावल्याचे समजताच नाल्यातच तिचा मृतदेह पुरून टाकला. युनूस हाती लागताच अन्य आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. दरम्यान, रोजान व जितेंद्रला नवघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत दोघांनी हुमेराचा मृतदेह पुरण्यात मदत केल्याचे कबूल केले. चौथा आरोपी राजेश मात्र पसार झाला. (प्रतिनिधी)>युनूसचे नेहमी घरी येणे-जाणेसर्व आरोपी आझादनगरमागील मैदानातच झोपड्यांत राहायचे. भंगार गोळा करणे, माल वाहणे अशी मिळेल ती कामे करायचे. गांजाचे व्यसन त्यांना होते. युनूसला अश्लील क्लिप पाहण्याचा छंद होता. तो हुमेराच्या वडिलांच्या टेम्पोत भंगार भरण्याचे काम करायचा. त्याचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते.