शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

खुनानंतर तीन तास ‘ती’ मृतदेहाजवळच, अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:59 AM

लग्नाच्या नावाखाली आपला विश्वासघात केल्यानेच त्याचा खून केल्याचे तिने मान्य केल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

ठाणे : अनैतिक संबंधांनंतर लग्नाला नकार देणाऱ्या कबीर अहमद लष्कर (२५) या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्यानंतर त्याच्याच मृतदेहाजवळ तीन तास बसून काढल्यानंतर भानावर आलेल्या रूमा बेगम लष्कर (२८) हिने बंगलोरला पळ काढला. तिला बंगलोरमधून ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले.कबीर हा रूमा बेगम हिचा पती अन्वर हुसैन याच्या जिगनी (जि. अनिकल, कर्नाटक) येथील सायकल दुकानात नोकरीला होता.

त्यामुळेच त्याची आणि रूमा बेगमची ओळख झाली होती. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाल्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. दरम्यान, तो कर्नाटकातून ठाण्यात आला आणि घोडबंदर रोडवरील एका दुकानात नोकरीला लागला. ‘माझ्याशी लग्न करायचे असेल, तर कर्नाटकातील घरदार सोडून तू ठाण्यात ये’, असे त्याने तिला प्रलोभन दाखवले. ठरल्याप्रमाणे ती १६ मार्च रोजी ठाण्यात आली. मात्र, त्याने लग्नाला नकार दिला. १७ मार्च रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. याच रागातून तिने १८ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झोपेतच त्याच्या डोक्यात वीट टाकून त्याला जखमी केले. झोपेतून जाग आल्यावर तो तिला मारण्यासाठी झेपावल्यानंतर तिने चाकूने त्याच्या गुप्तांगावर वार केला.

नंतर, गळाही आवळला आणि तो जिवंत राहू नये म्हणून उंदीर मारण्याचे औषधही त्याच्या तोंडात कोंबले. या झटापटीत त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे खुनानंतर त्याच्या मृतदेहाजवळ पहाटे ५ वाजेपर्यंत तिने बसून काढले. भानावर आल्यावर स्वत:च्या रक्ताचे डाग पुसण्यासाठी अंघोळ करून पहाटेच त्याचे घर सोडले. ठाण्यातून पुणेमार्गे बंगलोर येथून जिगनी गावी परतल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. कबीरला त्याच्या ठाण्यातील सायकल दुकानाचा मालक शोधत त्याच्या घरी आला, त्यावेळी त्याचा खून झाल्याचे उघड झाले. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी आणि वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कैलास टोकले, उपनिरीक्षक रूपाली रत्ने, जमादार मधुकर कोठारे, हवालदार अंकुश पाटील आणि दीपक बरले यांच्या पथकाने थेट विमानाने बंगलोर गाठून अवघ्या काही तासांतच तिला अटक केली. सुरुवातीला या खुनाशी संबंध नसल्याचा दावा करणाºया रूमा बेगमने नंतर अखेर या खुनाची कबुली दिली.

कबीरने लग्नाच्या नावाखाली आपला विश्वासघात केल्यानेच त्याचा खून केल्याचे तिने मान्य केल्याचे उपायुक्त लोखंडे यांनी सांगितले. तिच्याकडून खुनातील चाकू आणि वीट हस्तगत करण्यात आली असून तिला सात दिवसांची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली आहे.ओळख न पटण्यासाठी कागदपत्रे नेली...खुनानंतर कबीरची कोणतीही ओळख पटू नये, म्हणून रूमा त्याचे आधार आणि पॅनकार्डही बंगलोरला जाताना घेऊन गेली. बंगलोरला पोहोचल्यानंतर आता आपल्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही, अशा आविर्भावात असतानाच पोलिसांनी पाठोपाठ विमानाने जाऊन पकडल्यानंतर मात्र तिला चांगलाच धक्का बसला.कोणताही धागादोरा नसताना..कबीर याचा खून झाल्यानंतर त्याचा खून एका महिलेने केल्याची शक्यता वर्तविली जात होती. तीन दिवसांपूर्वीच एक महिला त्याच्या घरी आली होती. इतकीच त्रोटक माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. विशेष म्हणजे बेंगलोर येथून आलेली रुमाबेगम यापूर्वी कधीही ठाण्यात आली नव्हती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तिला जेरबंद केले.