शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

अंत्यसंस्कारासाठी लीटरभर रॉकेलकरिता तीनशेचा दर

By admin | Published: August 30, 2016 11:04 PM

सोमवारी एका अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांकडे येथील कर्मचाऱ्याने एका लीटर रॉकेलसाठी चक्क ३०० रुपयांची मागणी केली.

जितेंद्र कालेकर/ सुबोध कांबळेठाणे, दि. 30 - मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरा रोड पूर्व येथील स्टेशन रोड परिसरातील स्मशानभूमीत सुरू असून सोमवारी एका अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांकडे येथील कर्मचाऱ्याने एका लीटर रॉकेलसाठी चक्क ३०० रुपयांची मागणी केली. या प्रकाराने नातेवाईकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मीरा रोड येथील रहिवाशी संजय शिंदे यांचे वडील कृष्णा शिंदे (६२) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मीरा रोड स्मशानभूमीत दुपारी २ वा. च्या सुमारास पोहचली. अंत्यविधीसाठी शासकीय कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अग्निडाग देण्यासाठी त्यांचे पार्थिव काढण्यात आले त्यावेळी तेथील कर्मचारी निवृत्ती कटारनवरे याने अंत्यसंस्कारासाठी लाकडांची मांडणी करतांनाच संजय शिंदे यांच्याकडे तूप, सुंभ आणि रॉकेलसाठी पैशांची मागणी केली. त्यात रॉकेलसाठी प्रति लीटरमागे त्याने ३०० रुपयांचा दर सांगितला.

नातेवाईक आणि आप्तेष्ट सर्वच दु:खात असल्यामुळे कोणीच तिथे ‘भाव’ करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नेमका हाच फायदा या कर्मचाऱ्याने उचलल्याचे काहींनी निदर्शनास आणले. त्यावेळी अनेकांनी तिथे आरडाओरडा केल्याने तो रॉकेल आणून न देताच तिथून निसटला. ही बाब स्मशान अधिकारी शाम चौगुले यांच्या निदर्शनास संजय शिंदे यांनी आणली. त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देत तिथून पळ काढला.

बाजारभावानुसार रॉकेलचा दर २६ रुपये लीटर असतांना ३०० रुपयांचा दर कसा काय सांगितला. याबाबतची विचारणा केल्यानंतर निवृत्तीने अंत्यविधीची तयारी अर्धवट सोडून तिथून काढता पाय घेतला. पालिका प्रशासनाने यापुढे तरी मृतांच्या नातेवाईकांना आणखी आर्थिक फटका बसणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.अशीही मदत...याच स्मशानभूमीत दुसऱ्या शिफ्टसाठी आलेल्या कर्मचाऱ्याने मात्र अर्धा लीटर रॉकेल बाहेरुन आणून दिले. आपण ही सेवा करतो, असे सांगत संबंधितांकडून पैसेही घेतले नाही. तर रॉकेलसाठी अडवणूक झाल्याचा प्रकार मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला कळताच त्याने पाच लीटर रॉकेल आणून दिले आणि नातेवाईकांचे सांत्वनही केले. ‘‘ दु:खद घटनेच्या ठिकाणी अशा प्रकारे अडवणूक करणे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल.’’संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मीरा भार्इंदर महापालिका.