डिप्पी वांकाणी, मुंबईइंडियन मुजाहिदीनचे(आय एम) तीन दहशतवादी इस्लामिक संघटनेत सहभागी झाले असून, सीरियात युद्ध करत असल्याचे एनआयए या राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे. २००८च्या स्फोटातील आरोपी असणाऱ्या या तिघांवर प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले आहे. एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, इंडियन मुजाहिदीनचे संस्थापक नेते रियाझ व इकबाल भटकळ यांच्याशी मतभेद झाल्यानंतर या तिघांनी इंडियन मुजाहिदीन सोडून अफगाणिस्तानातील तालिबान संघटनेत प्रवेश केला व अलीकडेच इसिसमध्ये प्रवेश केला. मोहम्मद खालिद, अरिझ खान उर्फ जुनैद व मिर्झा शादाब बेग अशी त्यांची नावे असून, एनआयएला जयपूर, अहमदाबाद व दिल्ली येथे २००८ साली झालेल्या स्फोटाप्रकरणी हे तिघे हवे होते. या तिघांबरोबर इसिसच्या युद्धात सहभागी झालेला मोहम्मद साजिद उर्फ बडा साजिद हा गेल्या आठवड्यात ठार झाला आहे. या फरार दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी या चौघांचा अफगाणिस्तानात एका जीपमध्ये बसलेला फोटो पाहिला, त्यावरून हे तालिबानमध्ये सहभागी झाले असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला. हे चौघेही उत्तर प्रदेशातील आझमगड येथील असून, त्यांना भटकळ बंधूंनी इंडियन मुजाहिदीनमध्ये सहभागी करून घेतले होते. जिहादच्या नावावर भटकळ बंधू स्वत:च पैसे कमावत असल्याचे या चौघांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी इंडियन मुजाहिदीन सोडली. चौघांपैकी एक जण मारला गेला आहे.
‘आयएम’चे तीन दहशतवादी इसिसमध्ये
By admin | Published: July 10, 2015 4:00 AM