शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

जळगावमध्ये ट्रक उलटून ३ ठार, ६० जखमी

By admin | Published: January 08, 2017 2:51 PM

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे आयशर टेम्पो उलटून होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक लोक गंभीर

ऑनलाइन लोकमत
 
जळगाव, दि. 8 -  सावखेडा बुद्रुक येथील यात्रेस भैरवनाथांच्या नवसाला जाणारा ट्रक उलटून ३ जण ठार तर जवळपास ६० जण जखमी झाले. यापैकी अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा भिषण अपघात रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास वरखेडी- आंबेवडगाव रस्त्यावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने झाला.

८ रोजी भैरवनाथ यात्रोत्सवाचा दुसरा रविवार होता. पौष महिन्यात दर रविवारी ही यात्रा भरते. या दिवशी शेंदुर्णी येथील शालीकराम तुकाराम कोथलकर यांच्या नातुचा नवस होता. सकाळी ९.४५ च्या सुमारास बाया,मुले,माणसानी भरलेला आयशर ट्रक (एम.एच.-१९ एस.५०३०) शेंदुर्णी कडून भैरवनाथ यात्रोत्सावाकडे नवसासाठी येत असताना वरखेडी-अंबेवडगाव रस्त्यावर वरखेडी पासून २ कि.मी.च्या अंतरावर अमोल माळी या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा ट्रक डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली शेतात उतरला याठिकाणी शेताचा बांध असल्याने या नालीत हा भरधाव ट्रक आदळला व उलटला. ट्रक मधील बाया, मुले, माणसे इतस्त: फेकले गेले, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

हा रस्ता मुम्बई-नागपूर राज्यमार्ग -१९ असून नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यातल्यात्यात यात्रोत्सवामुळे आणखीनच जास्त वर्दळ होती.

अ‍ॅम्ब्युलन्स लगेच दाखलघटनास्थळी उपस्थित लोकांनी ताबडतोब १०८ ला फोन करीत अ‍ॅम्ब्युलन्स चा बंदोबस्त केला. अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अ‍ॅम्ब्युलन्स दाखल झाली व त्यानंतर १५ मिनिटांनी ५ ते ७ अ‍ॅम्बुलंस येथे आल्यात.जखमींची संख्या जास्त असल्याने पत्रकार दिलीप जैन यांनी त्यांच्या वाहनात रुग्ण रवाना केलेत. तर वरखेडी येथील काळी-पिली चालक नाना तिरमली व काही खाजगी वाहन धारकांनीही आपल्या वाहनातून रुग्णांना नेण्यासाठी सहकार्य केले. अ‍ॅम्ब्युल्नस चाकल बबलू पाटील व निळकंठ पाटील आदींनीही मदत केली. सर्व रुग्णांना प्रथम पाचोरा आणले. व नंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळ पर्यंत जिल्हा रुग्णालयात ३७ जखमी दाखल झाले होते. याघटनेची पिंपळगाव हरे. पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलीस घटनास्थळी हजरपिंपळगाव (हरे.)पोलीस स्टेशनचे स.पो.नि.संदीप पाटील, पी.एस. आय. वाघ हे भैरवनाथ यात्रोत्सवात बंदोबस्तावर होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले. ंआणि वाहतूकही सुरळीत केली. पिंपळगाव (हरे.)पोलीस स्टेशनचे स.पो.नि.संदीप पाटील हे स्वत: पंचनामा होईस्तोवर येथे थांबून होते. जखमींची संख्या जवळपास ६० असल्याचे त्यांनी सांगितले.पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांनीही अपघातस्थळी भेट देवून पाहणी केली.व सूचना दिल्या.

पाचोरा रुग्णालयात गर्दीपाचोरा रुग्णालयात जखमींना सकाळी सव्वादहाच्या दरम्यान आणले असताना तेथे एकच गर्दी उसळली. नागरिकांसह राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पाचोरा येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमींवर उपचारार्थ मदत केली. यात डॉ. चारुदत्त खानोरे, डॉ. दिनेश सोनार, डॉ. मंदार कळंबेकर, डॉ. प्रवीण माळी, डॉ. प्रजापत, डॉ. अमीत साळुंखे, डॉ. विजय भोसले यांचा समावेश आहे. अपघातस्थळी आक्रोश अपघात होताच एकच आक्रोश घटनास्थळी पसरला. ट्रक मधील ५ ते ६ जण गंभीर अवस्थेत तर २० ते २२ जणांना जोरदार मार बसला. कुणाचा पाय, कुणाचा हात तुटला तर कुणाच्या हाताची बोटे कापली गेली. कुणाच्या डोक्याला मार लागलेला, रक्ताचा सडा पडलेला अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी प्रत्येकाचे हृदय हेलावून सोडत होती. एकच आक्रोश या ठिकाणी दिसून येत होता. लहानमुले तर अगदी भेदरलेली आणि सुन्न झालेली होती. जो-तो अ‍ॅम्बुलंस मागवा ची आर्त विनवणी करीत होता.मयतांची नावे दोन जणांचा जळगाव रुग्णालयात नेताना तर एकाचा पाचोरा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. यातील एका मयताचे नाव रतन शिवलाल बारी (रा. शेंदुर्णी वय ५०) असे असून पाचोरा रुग्णालयात त्यास गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तर जळगाव रुग्णालयात मंगला रतीलाल बारी (वय 35) व कडूबा दामू लोहार (वय ६०) रा. शेंदुर्णी या महिलेचा मृत्यू झाला.