लोणावळा : मुंबई- पुणो एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळील खोल दरीत कोसळून अपघातग्रस्त झालेल्या बसमधील मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच जखमींचा उपचाराचा सर्व खर्च देण्यात येणार असल्याचे एसटीचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितल़े
मृत चालकाच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी व नियमाप्रमाणो नुकसानभरपाई देण्यात येणार आह़े चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार संघाचे सचिव हनुमंतराव ताटे, प्रादेशिक अभियंता प्रकाश पाटील, यंत्र अभियंता अरुण गोल यांनी शनिवारी सकाळी अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली़ तसेच अपघातच्या सर्व बाबींचे निरीक्षण केले.
साता:याहून मुंबईकडे निघालेली एसटीची हिरकणी बस कुणोनामा पुलावरून खोल दरीत कोसळली होती. बसचा चालक राजाराम ज्ञानोबा शिवतरे (49, रा़ सातारा) व प्रवासी विजय गोपाळ तोडकर (67, रा. वारजे माळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)
संरक्षण भिंतीची मागणी
तुंगार्ली गोल्ड व्हॅलीपासून खोपालीर्पयतचा भाग पूर्णत: उतार तसेच वळणांचा आह़े त्यामुळे येथे वाहनांवरील ताबा सुटून अपघाताच्या घटना घडत असतात़ एसटीचा अपघात झाला तो भाग उड्डाणपुलाचा आह़े असे असताना दरीच्या काही भागात दगडी भिंतीऐवजी लोखंडी रेलिंग लावले आह़े यामुळे एखाद्या वाहनाचा ताबा सुटल्यावर ते वाहन रेलिंग तोडून सरळ दरीत जात़े यापूर्वी या ठिकाणी दोन अपघात घडले आहेत, त्या वेळी रस्ते विकास महामंडळ व आयआरबीकडे सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने या भागात अपघतांना निमंत्रण भेटत आह़े