शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तीन मोठ्या तरतुदी

By admin | Published: March 29, 2017 5:24 PM

मुंबई महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - मुंबई महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अंदाजित खर्च 12 हजार कोटी आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूदही करण्यात आली. त्याचसोबत मुंबईतला पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहनतळांची संख्या तीन पट वाढणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र या अर्थसंकल्पातून बेस्टच्या पदरी निराशा पडली आहे. अर्थसंकल्पात बेस्टला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद केली असून, यासाठी 12 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसंच गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दिवसेंदिवस मुंबईकरांना पार्किंगचा प्रश्न सतावत असल्यानं वाहनतळांची संख्या तीन पट वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. वाहनतळांची संख्या 92वरुन ही संख्या 275करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे, तसंच तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी 1 कोटींची तरतूद केली आहे. दुसरीकडे रस्ते कामांमध्ये यंदा बरीच काटकसर करण्यात आली आहे. रस्ते पुनर्बांधणीसाठी 1,095 कोटींची तरतूद केली असून, मागील वर्षी 2886 कोटी एवढी तरतूद करण्यात आली होती. तर यंदा नालेसफाईसाठी 74 कोटींची तरतूद केली आहे. मुंबई महापालिकेचा 2017-18 साठीचा अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदीबेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद नाहीकोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद, संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित रक्कम 12 हजार कोटीगोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूदरस्ते दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी 1095 कोटींची तरतूद, गेल्या वर्षी 2886 कोटी इतकी तरतूद मुंबईतला पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहनतळांची संख्या तीन पट वाढणारवाहनतळांची संख्या 92वरुन ही संख्या 275करणार, तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी 1 कोटींची तरतूदमाहिती आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत महापालिका रुग्णालयांमध्ये अद्ययावत माहिती प्रणाली उभारणारमेडिकल हिस्ट्री, प्राथमिक रिपोर्टस्, रुग्णांची नोंदणी, इ. माहितीसाठी सॉफ्टवेअरमाहुल आणि गजदरबांध पंपिंग स्टेशनसाठी 65 कोटींची तरतूदशालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाइन पोर्टल तयार करणारनालेसफाईसाठी 74 कोटींची तरतूदमिठी नदीच्या किना-यावरील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवणे, सुशोभीकरण करणे यासाठी 25 कोटींची तरतूदकॅशलेस व्यवहार आणि एम गव्हर्नन्ससाठी महापालिकेच्या 115 सेवाएम- गव्हर्नन्स ( मोबाईलद्वारे नागरी सुविधा) अंतर्गत आणणार, कॅशलेस व्यवहारास चालना देणारशालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल तयार करणारउघड्या नाल्यांचे आच्छादीकरणासाठी नाल्यांवर अ‍ॅक्रेलिक पत्रे टाकणार, मुलुंड, कांदिवली येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवणार, ९ कोटींची तरतूदपर्जन्य जलवाहिन्यांसाठी 475 कोटींची तरतूदमहापालिका रुग्णालयात 9 नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स सुरू करणारप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया संसर्गरहित होण्यासाठी हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर गरजेचेयासाठी 21.50 कोटींची तरतूदमहापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या 400पेक्षा जास्त वाढवण्यासाठी 30 कोटींची तरतूदमहापालिकेच्या 28 प्रसूतिगृहांचा दर्जा वाढवण्यासाठी, आधुनिकीकरणासाठी 8.90 कोटींची तरतूदमहापालिकेच्या दवाखान्यातून नि:शुल्क निदान सेवा उपलब्ध करून देणार, त्यासाठी 16.15 कोटींची तरतूदगोरेगाव पूर्वमध्ये मल्टिस्पेशॅलिटी क्लिनिक सुरू करणार, 10 लाखांची तरतूदहगणदारीमुक्त मुंबईसाठी तरतूद, सामुदायिक शौचालये 76 कोटी, घरगुती शौचालये 5.70 कोटी, सार्वजनिक शौचालये 2.88 कोटीसार्वजनिक शौचालयांमध्ये वीज, पाणी पुरवठ्यासाठी 26.37 कोटींची तरतूद. मात्र, महिला शौचालयांसाठी भरीव तरतूद नाहीच. मुंबईभरात येत्या वर्षांत महिलांसाठी केवळ 8 नवी शौचालयेराईट टू पीसाठी महापालिकेची भरीव तरतूद नाहीमुंबई शहराच्या साफसफाईसाठी खास यांत्रिक झाडू आणणार, 20 कोटींची तरतूदसामूहिक शौचालयांध्ये 100 नवीन सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन आणि इन्सनरेटर स्थापित करणार, यासाठी 1 कोटींची तरतूदडम्पिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रियेसाठी, कच-यापासून वीजनिर्मितीसाठी 150 कोटींची तरतूदयेत्या वर्षात मुंबईत 84 मैदानांचा विकास करण्यासाठी 26.80 कोटींची तरतूदमुंबईतल्या २० उद्याने/मनोरंजन मैदानांच्या विकासासाठी 70 कोटींची तरतूद8 ठिकाणी नवे जलतरण तलाव, कांदिवलीत ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव यासाठी 45 कोटींची तरतूदवांद्रे किल्ला क्षेत्रासाठी 1 कोटींची तरतूदवांद्रे तलावाच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटींची तरतूदमुंबई सागरी किनारा रस्ता -1000 कोटींची तरतूदगोरेगाव - मुलुंड जोडरस्ता - 130 कोटी रस्ते व वाहतूक खाते - 1095 कोटी पूरप्रवण क्षेत्रांचे निर्मूलन - 74 कोटी मिठी नदी - 25 कोटी उघडे नाले बंदिस्त करणे - 9 कोटी पर्जन्य जलवाहिन्या - 475 कोटी आरोग्य व वैद्यकीय सेवा - 3311 कोटी शिक्षण - 2311 कोटी घन कचरा व्यवस्थापन - 2122 कोटींची तरतूदउद्याने - 291 कोटी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय - 50 कोटी अग्निशमन दल - 195 कोटी बाजार व मंड्यासाठी - 75 कोटीइमारत परिरक्षण - 320 कोटी देवनार पशुवधगृह - 2 कोटी महापालिका मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी - 10 कोटी अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह - 5 कोटी यांत्रिकी व विद्युत खाते - 15 कोटी पीएनजी गॅस प्रकल्प - 1 कोटी आपत्कालीन विभाग - 11 कोटी 75 लाख कामगार विभाग - 12 कोटी 67 लाख सुरक्षा विभागाचे आधुनिकीकरण - 15 कोटी टेक्सटाईल म्युझियम बांधणे - 2 कोटी 50 लाख भारताचे स्वातंत्र्य संग्रहालय - 1 कोटी भाऊ दाजी लाड संग्रहालय - 7 कोटी रायफल क्लब - 50 लाख पाणी पुरवठा सुधारणा - 27 कोटी 81 लाख जल बोगदे - 25 कोटी जलाशयांची दुरुस्ती - 18 कोटी 70 लाख जलविभागासाठी - 194 कोटी उद्याने - 13 कोटी 30 लाख मलनिःसारण प्रकल्पांसाठी - 444 कोटी