लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदानास जुलै ते सप्टेंबर अशी पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. कांदा उत्पादकांचा मोठ्या प्रमाणावर कांदा पडून असल्याने ही मागणी डॉ.भामरे यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे मांडली. त्यावर बुधवारी चर्चा होऊन मुदतवाढीचा निर्णय झाला. सुमारे २० महिन्यांपासून कांदा बाजारात मंदी असून गेल्या उन्हाळ्यातही कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे अतिरिक्त ठरू पाहणारा कांदा निर्यातीच्या माध्यमातून परदेशी पाठवावा, यासाठी अनुदान सुरू ठेवणे गरजेचे असल्याची भूमिका मांडण्यात आली. त्यावर अनुकुलता दर्शवत अर्थमंत्री जेटली यांनी तसे निर्देश लवकरच निर्गमित करण्यात येतील असे सांगितले, असे भामरे यांनी सांगितले.
कांदा निर्यात अनुदानास तीन महिन्यांची मुदतवाढ
By admin | Published: June 30, 2017 1:33 AM