लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण प्रकरणी नौपाडा पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.शंकर कदम, सिद्धेश निकम आणि चव्हाण अशी या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री सीसीटीव्हीमध्ये मिळालेल्या फुटेजच्या आधारे कदम, निकम आणि चव्हाण या तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना १४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी सायंकाळी माळवी हे आपल्या पथकांसह नौपाड्यातील गावदेवी भागात पदपथावरील अतिक्रमणे काढण्यासाठी गेले असता, प्रवेश देशपांडे आणि काही फेरीवाल्यांनी त्यांना जबर मारहाण केली. सुरुवातीला देशपांडे आणि फेरीवाला संघटनेचे सचिव बाबुराव खेडेकर यांना गुुरुवारी सकाळी नौपाडा पोलिसांनी अटक केली.
उपायुक्त मारहाण प्रकरणी आणखी तिघांना अटक
By admin | Published: May 13, 2017 2:28 AM