पंढरपूर (जि़सोलापूर): राष्ट्रवादीने राज्यातील विद्यमान चारपैकी तीन खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यात माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव नाही. माढा लोकसभेचं घोंगडं भिजत का ठेवलं? असा सवाल उपस्थित करीत जाणूनबुजून मोहिते-पाटील यांची कुचंबणा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संतप्त सवाल मोहिते-पाटील समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे.२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले़ तेव्हा राज्यातून राष्ट्रवादीचे केवळ चार खासदार विजयी झाले़ माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कोल्हापुरातून धनंजय महाडिक व बारामतीतून सुप्रिया सुळे हे विजयी झाले़ आता या चारपैकी तीन विद्यमान खासदारांना पुन्हा त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली़ पण माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी का जाहीर केली नाही,त्यांना का डावलण्यात आले? असा सवाल आता मोहिते-पाटील समर्थक विचारू लागले आहेत.सध्या माढा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा आणखी गुतागुंतीचा झाला़ आहे. माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. संजय शिंदे यांनी प्रथम शरद पवार यांची भेट घेतली नंतर मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून त्यांना जाऊन भेटले.एकूणच माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा तिढा वाढल्याचे पाहावयास मिळाले आहे. या सर्व घडामोडींनंतर खा.विजयसिंह मोहिते पाटील हे पुत्र माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही तर भाजपातून निवडणूकलढावावी यासाठी कार्यकर्त्यांमध्१ाून दबाव वाढत आहे.सुभाष देशमुख यांचे दौरे वाढलेराष्ट्रवादीच्यावतीने उमेदवार जाहीर झाला नसल्याने भाजपनेही उमेदवार जाहीर केला नाही़ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे दौरे मात्र या मतदारसंघात वाढले आहेत़ अगदी खेड्यातील देवीच्या मंदिरातही बैठका सुरू झाल्या आहेत़ यावरूनच लक्षात येते की, पक्षाने त्यांना तयारीला लागा असा, आदेश दिल्याचे दिसून येते़
राष्ट्रवादीच्या तीन खासदारांना तिकीट; विजयसिंह मोहिते-पाटील समर्थकांच्या संतप्त भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 6:53 AM