शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

दादर स्थानकात होणार तीन नवीन प्लॅटफॉर्म!

By admin | Published: September 29, 2016 2:34 AM

मध्य रेल्वेवरील सीएसटी ते कुर्ला अशा पाचवा-सहावा मार्गाच्या प्रकल्पात परेल टर्मिनस बांधले जाणार आहे. हे टर्मिनस बांधले जात असतानाच, या प्रकल्पात आता दादर स्थानकाचाही

- सुशांत मोरे, मुंबई

मध्य रेल्वेवरील सीएसटी ते कुर्ला अशा पाचवा-सहावा मार्गाच्या प्रकल्पात परेल टर्मिनस बांधले जाणार आहे. हे टर्मिनस बांधले जात असतानाच, या प्रकल्पात आता दादर स्थानकाचाही कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आणखी तीन नवे प्लॅटफॉर्म दादर स्थानकात बांधले जाणार असून, त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या संख्येत वाढ होईल. हे प्लॅटफॉर्म बांधतानाच या स्थानकातील प्लॅटफॉर्मची संख्या एकूण अकरावरही जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.सीएसटी ते कुर्ला अशी पाचवी-सहावी मार्गिका तयार केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून लोकल सोडण्यात येतील. त्यामुळे दादर स्थानकातील भार आणखी कमी होण्यास मदत मिळेल. पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम करतानाच, काही स्थानकांत बदलही केले जाणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेवरील सर्वात व्यस्त अशा दादर स्थानकाचाही समावेश आहे. पाचव्या-सहाव्या मार्गिकेला जागा मोकळी करून देतानाच, आणखी तीन नवे प्लॅटफॉर्म बांधले जातील, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली. मध्य रेल्वेचे दादर आणि परळच्या दरम्यान पश्चिम दिशेला रेल्वेची मोकळी जागा असून, पाचवी-सहावी मार्गिका त्याच दिशेने होणार आहे. त्यामुळे सध्याच्या मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ हा आणखी पश्चिम दिशेला सरकवला जाईल.कशा असतील मार्गिका- प्लॅटफॉर्म क्रमांक १च्या बाजूला कल्याणच्या दिशेने जाणारी धिमी मार्गिका असून, त्याच्या पश्चिम दिशेला आणखी दोन नवीन प्लॅटफॉर्म बांधले जातील. असे तीन नवे प्लॅटफॉर्म दादर स्थानकात अस्तित्वात येतील. यामुळे धिम्या, जलद व मेल-एक्स्प्रेसच्या गाड्यांसाठी जादा मार्गिका उपलब्ध होतील.येथून आणखी काही लोकल सोडण्याचे नियोजनही केले जाईल.- पश्चिम दिशेला दोन नव्या मार्गिका असतील.त्याच्या बाजूला असणारी मार्गिका ही सीएसटी दिशेला जाणारी मार्गिका असेल. - त्याच्या बाजूलाच असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३च्या दिशेची मार्गिका म्हणजेच सध्याची कल्याणकडे जाणारी धिम्या लोकलची मार्गिका लूप लाइन असेल. या मार्गिकेवरून दादर लोकल सोडता येईल. - सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २च्या बाजूची मार्गिका डाउन जलद मार्गिका असेल. - सध्याच्या प्लॅटफॉर्म ३ वर सीएसटीकडे जाणाऱ्या जलद लोकल थांबतील. - सध्याच्या प्लॅटफॉर्म ४ वरून जलद दादर लोकल सोडण्यात येईल. - सध्याचे ५ आणि ६ क्रमांकाचे प्लॅटफॉर्म हे प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ म्हणून ओळखले जातील. सीएसटी स्थानकावरील ताण होणार कमीमेल-एक्स्प्रेससाठी पर्याय म्हणून दादर स्थानकात पाच, सहा, सात व आठ नंबर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यातील ५ आणि ६ नंबर प्लॅटफॉर्म हा लोकल गाड्यांसाठीही उपलब्ध असतो. त्यामुळे एकच गोंधळ उडतो. नवीन प्लॅटफॉर्म झाल्यास, दादर स्थानकातच मेल-एक्स्प्रेसचा शेवट करून त्या देखभाल-दुरुस्तीसाठी वाडीबंदर येथे नेणे शक्य होईल. त्याचप्रमाणे, दादरमधूनही काही मेल-एक्स्प्रेस ट्रेन शक्य होऊ शकते, असे सांगण्यात आले. नवीन प्लॅटफॉर्ममुळे उपनगरीय लोकल सेवांमध्येही वाढ करता येईल. दादर स्थानकातून जलद लोकलबरोबरच आणखी काही धिम्या लोकल सोडण्याचे नियोजन केले, तर सीएसटीवरील लोकलचा भारही कमी होईल.