ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 12 - भुसावळकडून सूरतकडे जाणा-या प्रेरणा एक्सप्रेसखाली चिरडून तीन जणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नरडाणा रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावर प्रेरणा एक्सप्रेसखाली चिरडून तीन जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर मृत झालेल्या व्यक्तींसोबत असलेल्या २८ वर्षीय महिलेचा अाणि तिच्या लहान मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही. पिंटु आसाराम भील ( ३५) शिवदास भील (२८) आणि मोठाभाऊ भील (१८) अशी मृतांची नावे आहेत. तर विठाबाई पिंटु भील (28)आणि लहान मुलगी अक्काबाई अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. भील कुटुंबिय हे ब्राम्हणे (ता.अमळनेर) येथील असून ते सध्या धुळे जिल्हातील म्हळसर (ता.शिंदखेडा) येथे वास्तव्यास होते.
दरम्यान, हे त्याठिकाणी का पोहचले हे समजू शकलेले नाही. या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.