मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर कुडे गावाचे हद्दीत आयआर बी कंपनी व वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या दुर्लक्षाने नादुरुस्त टेम्पोमुळे तीन मोटर वाहनांचा अपघात होऊन तीन जण गंभीर तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस घटनास्थळी नसल्याने स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जखमींना वैद्यकिय मदत उपलब्ध करुन दिली व वाहतूक कोंडी सोडवली.मुंबई अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी कुडे गावाच्या हद्दीत गुजरातच्या दिशेने जाणारा टेम्पो नादुरु स्त असल्या मुळे तो बाजूला उभा करण्यात आला होता. मात्र, तो सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस व पेट्रोलिंग करणारे आयआरबी कंपनीचे कर्मचारी न पोहचल्याने सायंकाळी ६.३० च्या सुमारास मुंबई कडून गुजरातकडे जाणारा ट्रक त्या टेम्पोला धडकला. त्या नंतर त्याच दिशेने जाणारा दुसरा ट्रक त्या दोन्ही वाहनाला धडकून डिव्हायडर ओलांडून मुंबई वाहिनी वर येऊन त्या ट्रक ला धडकून अपघात घडला. याची माहिती वाहतूक शाखेला दिली. मात्र कोणीही घटनास्थळी न पोहचल्याने मनोर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज चाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना वैद्यकिय मदत उपलब्ध करुन दिली. तसेच वाहतूक कोंडी सुरळीत केली वाहनांना किरकोळ लागलेली आग ग्रामस्थ व पोलिसांनी विझवली. (वार्ताहर)>अपघाताची पुनरावृत्तीहलोली पाडोसपड्यावर चार महिने अगोदर अशीच घटना घडली होती. ते ठिकाणी आता घडलेल्या घटनास्थळापासून तीन किमी अंतरावर आहे. तेथे नादुरु स्त ट्रेलर ला झाईलो जीपने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला होता. इतर चार गंभीर जखमी झाले होते.पोलिसांची अरेरावीवाहतूक पोलीस व आय आर बी कंपनीचे पेट्रोलिंग करणारे त्यावेळी असते तर कदाचित तोे अपघात घडला नसता.अपघाताची माहिती देण्यासाठी ग्रामस्थ वाहतूक नियंत्रण शाखेचे पीआय ठोंबरे, यांच्याकडे गेले असता त्यांनी अरेरावीची भाषा केली.
वाहनांच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी
By admin | Published: September 19, 2016 3:16 AM