शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

डिप्लोमाच्या एक लाख जागांसाठी तीन फेऱ्या; एसईबी विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:04 AM

यंदा डिप्लोमा प्रवेशात एसईबीसी (मराठा आरक्षण) विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित असतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहावीनंतरच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या जवळपास ४०० शिक्षण संस्थांमधील एक लाख पाच हजार जागांच्या प्रवेशासाठी तीन कॅप फेऱ्या घेण्यात येणार आहेत. यंदा डिप्लोमा प्रवेशात एसईबीसी (मराठा आरक्षण) विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित असतील. वर्किंग प्रोफेशनल आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश  देण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. मंगळवारपासून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. डिप्लोमाला २०२०-२१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७ वर गेली आहे. गेली चार वर्षे डिप्लोमा प्रवेशांत वाढ होत आहे. डिप्लोमात सिव्हील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या मुख्य शाखा आहेत. डिप्लोमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करता येईल.

डिप्लोमाचे प्रवेश

वर्ष    शिक्षणसंस्था    झालेले प्रवेश    प्रवेशाची टक्केवारी

  • २०२०-२१    ३७६    ६२,१२२    ६०
  • २०२१-२२    ३६७    ६९,७०५    ७०
  • २०२२-२३    ३६५    ८४,४५२    ८५
  • २०२३-२४    ३८८    ८६,४६५    ८७

यंदा उपलब्ध जागा

  • ३९० संस्था 
  • १.०५ लाख जागा
  • ३१६ प्रवेशासाठी सुविधा केंद्रे
  • ३ कॅप फेऱ्या

ठळक बदल

  1. एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा आरक्षित
  2. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलकरिता स्वतंत्र तुकडी. हे वर्ग सकाळी, रात्री व सुटीच्या दिवशी घेण्यात येतील.
  3. थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश - विद्यार्थ्याना पदविका अभ्यासक्रमाची शाखा  त्याने बारावी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या विषयानुसार  निवडता येईल.
टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणexamपरीक्षा