कुंकळ्ळी : समुद्र खवळलेला असतानाही रशियन पर्यटकांना घेऊन जलसफर करणारी मोटरबोट मंगळवारी सकाळी खणगिणी समुद्रात उलटल्याने एलिना कुलेकोरा (46) या रशियन महिलेसह अन्य दोघा महिलांना जलसमाधी मिळाली.
स्थानिक जीवरक्षकांनी 11 पर्यटकांसह 3 बोटचालकांचे जीव वाचविले. मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मोबोर जेटीवरून रशियन पर्यटकांना घेऊन एक वॉटर स्पोर्ट्स बोट साळ नदी पार करून समुद्र सफरीला गेली होती. समुद्र खवळल्यामुळे चालकाने बोट किना:यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र लाटांच्या प्रवाहामुळे बोट पर्यटकांसह उलटली. बोटीत चौदा रशियन पर्यटक होते. (प्रतिनिधी)