विसापूर येथील घटना : तिघेही एकाच शाळेचे विद्यार्थीबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील तिघे जीवलग मित्र गुरूवारी सकाळची शाळा आटोपून घरी परतले. ते सायंकाळी ६ वाजता गावाजवळच्या बीपीएड कॉलेजजवळ एका खड्ड्यात पोहायला गेले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिनही चिमुकल्या शाळेकरी मुलांचा बुडून करुन अंत झाला. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. निरज विजय वैद्य (१४), क्षितिज अशोक डोंगरे (१२) व क्रीष्णा अशोक धामनगे (१२) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. ते बल्लारपूर येथील आयडीएल इंग्लिश माध्यम शाळेचे विद्यार्थी आहेत.निरज वैैद्य, क्षितिज डोंगरे व क्रिष्णा धामनगे हे तिघेही घरुन सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास बाहेर पडले. अशातच त्याचा एक मित्र त्यांच्या शोधात बीपीएड कॉलेजजवळील रामचंद्र पेंदोर यांच्या शेतातील खड्डयाजवळ पोहचला. तिथे त्याला खड्ड्याच्या काठावर मित्राचे कपडे दिसले. शेतमालक रामचंद्र पेंदोर यांनी संतोष मेश्राम यांना सांगितले. त्यांनी गावकऱ्यांना व मुलांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यावेळी खोल पाण्याच्या खड्ड्यात निरज व क्षितिज या दोघांचे प्रेत तरंगताना दिसले.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन बुडालेल्या तिसऱ्या मुलाचा शोध घेतला. लगेच क्रिष्णा धामनगे यालाही खड्ड्यातून बाहेन काढण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.तिघेही विद्यार्थी विसापूर येथील रहिवासी असून निरज विजय वैद्य हा वर्ग ८ मध्ये, क्रिष्णा अशोक धामनगे हा वर्ग ४ मध्ये तर क्षितिज अशोक डोंगरे हा वर्ग ६ मध्ये शिक्षण घेत होते. विजय वैद्य यांचा निरज एकुलता एक मुलगा होता. (शहर प्रतिनिधी)
तीन शाळकरी मुलांचा बुडून करुण अंत
By admin | Published: September 05, 2014 1:05 AM