पुणे : प्रियकरांनी लग्नास आणि पळून जाण्यास नकार दिल्यामुळे त्या अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले असून, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी प्रियकरांना मोबाईलवर मेसेज केल्याचेही निष्पन्न झाले आहे. खडक पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुल विनोद गोफणे (वय १८) आणि सोहेल मुस्ताफा शेख (वय २१, दोघही रा. भवानीपेठ, कासेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. आबेदा लुकमान शेख (वय १३), श्रुती दिगंबर वाघमारे (वय १५) या दोघींचे मृतदेह वानवडी परिसरात कालव्यामध्ये आढळून आले होते. मुस्कान इम्तियाज मुलतानी (वय १४, रा. भवानीपेठ, कासेवाडी) हिचा अद्याप तपास लागू शकलेला नाही. याप्रकरणी लुकमान मोहरम शेख (वय ४९, भवानीपेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान श्रुती हिचे राहुल गोफणेसोबत, तर आबेदा हिचे सोहेल सोबत आणि मुस्कानचे बाबू ऊर्फ मंदार निखिल सोरटे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. हे तिघेही पळून जाऊन लग्न करणार होते. त्यांच्याशी लग्न करण्यासाठी तीनही मुली घर सोडून पळून आल्या होत्या. कालव्याजवळ थांबून वाट पाहात असल्याचा मेसेज मुलांना पाठवला होता. परंतु, हे तिघेही जाणीवपूर्वक तेथे गेले नाहीत. तसेच, याची कोणालाही माहिती दिली नाही. त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर तिघीही बेपत्ता झाल्या होत्या.
त्या तिघींची आत्महत्या प्रेमभंगामधून
By admin | Published: October 03, 2016 1:40 AM