गजानन मोहोड
अमरावती : राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यात याच कालावधीत आॅक्टोबर अखेरपर्यंत ३ हजार १९० कर्जबाजारी शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासनाच्याच अहवालात स्पष्ट झाले. दरदिवशी तीन शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
सलग दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज तसेच अन्य कारणांमुळे शेतकºयांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगावं कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा हा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा आहे. त्यामुळे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवली जाते. ३१ आॅक्टोबर २०१८ च्या अहवालानुसार या सहा जिल्ह्यांमध्ये भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात ३१९० शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार, अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात ३१ आॅक्टोबरपर्यंत १४ हजार ५१२ कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यापैकी ६ हजार ४५१ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, ७ हजार ८७९ अपात्र ठरली. १८२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
कर्जमाफीच्या १५३ दिवसांत ४९९ शेतकरी आत्महत्याशासनाने जून महिन्यात शेतकºयांचे कर्ज माफ करण्याचा निर्र्णय घेतला. १३ लाख ७६ हजार ९१० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले. या पाच महिन्याच्या काळात म्हणजेच १५३ दिवसांत ४९९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या काळात दर सात तासात एका शेतक-याने मृत्यूचा फास गळ्यात घातला आहे. जून महिन्यात ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहे.
२००१ पासून १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्याविभागासह वर्धा जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३१ आॅक्टोबर २०१८ या काळात १४ हजार ५१२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये यंदाच्या वर्षात जानेवारी महिन्यात ९३, फेब्रुवारी १०५, मार्च ११२, एप्रिल ८२, मे ९७, जून ८२, जुलै ८७, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२२ व आॅक्टोबर महिन्यात ८९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहेत. यामध्ये अमरावती विभागात ९०३, तर वर्धा जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. वातावरण बदलामुळे कृषिक्षेत्रच धोक्यात आले आहे. यावर शासनाचे प्रयत्न चुकीच्या दिशेने होतात. त्यामुळे खरा लाभार्थी वंचित राहून आर्थिक स्तर खालावला आहे. शेतकरी आत्महत्या होऊच नये, यासाठी वरवरची मलमपट्टी न करता दीर्घकालीन उपाययोजना हव्यात. उद्धवराव फुटाणे, कृषितज्ज्ञ