शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

पोलीस चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार

By admin | Published: June 20, 2016 4:14 AM

शिरावर चार लाखांचे बक्षीस असलेला माओवादी संघटनेचा आदिलाबाद जिल्हाप्रमुख आत्राम शोभन ऊर्फ चार्लीस (३६) याच्यासह तीन नक्षलवादी पोलिसांच्या चकमकीत रविवारी ठार झाले

बी. संदेश, आदिलाबाद/ गडचिरोलीशिरावर चार लाखांचे बक्षीस असलेला माओवादी संघटनेचा आदिलाबाद जिल्हाप्रमुख आत्राम शोभन ऊर्फ चार्लीस (३६) याच्यासह तीन नक्षलवादी पोलिसांच्या चकमकीत रविवारी ठार झाले. अहेरी तालुक्यातील काटेपल्ली जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथक आणि हैदराबाद ग्रेहॉन्स पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.काटेपल्ली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविले जात असताना लपून बसलेल्यानक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत चार्लीस याच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील मुकेश ऊर्फ प्रभाकर व दिनेश ऊर्फ वसंता ठार झाले. पोलीस आणखी आक्रमक झाल्यावर इतर नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. माओवादी संघटनेचा जिल्हा प्रमुख चार्लीस हा तिरयांनी मंडलच्या रोमपल्ली येथील रहिवासी होता. तो २००४ मध्ये नक्षलवादी चळवळीत सहभागी झाला. अल्पावधीत जिल्ह्यात व महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात त्याने मोठ्या प्रमाणात नक्षल भरती केली. त्यामुळे त्याला डीसीएम (जिल्हा प्रमुख) बनविण्यात आले.