शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

शनिवार-रविवार दुपारी तीननंतर भुशी धरणाकडे वाहनांना प्रवेश बंदी

By admin | Published: July 05, 2017 4:27 PM

वलवण व खंडाळा येथील एंट्री पाँईट पासून अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री बारा दरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 5 -  भुशी धरण, लायन्स पाँईट, सहारा पुल धबधबा परिसरात होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी  दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी तीन नंतर भुशी धरणाकडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.  तसेच  वलवण व खंडाळा येथील एंट्री पाँईट पासून अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री बारा दरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे उपस्थित होते.
 
शिवथरे म्हणाले शनिवार व रविवार तसेच इतर सुट्टयांच्या काळात होणारी वाहतुक कोंडी व पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी काही पर्यायी मार्ग, वाहनतळे तयार करण्यात आली आहे. वलवण ते खंडाळा व कुमार चौक ते भुशी धरणापर्यतचा मार्ग सिसीटिव्हीच्या कक्षेत आणला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता व पावसाळी सिझन बंदोबस्ताकरिता 47 पोलीस अधिकारी, 231 पोलीस कर्मचारी, 63 महिला पोलीस, एक स्ट्रायकिंग फोर्सची मागणी करण्यात आली आहे. 
 
आणखी वाचा 
 
12 सेक्टर तयार करुन सिझन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून यापैकी 8 सेक्टर लोणावळा शहरातील भुशी धरण, वलवण, तुंगार्ली व लोणावळा धरण, रा‍जमाची पाँईट, कुमार चौक, सहारा पुल, रायवुड काँर्नर भागासाठी व चार सेक्टर लोणावळा ग्रामीण परिसरातील कार्ला व भाजे लेणी, लोहगड, विसापुर, तुंग व तिकोणा किल्ला, पवना धरण परिसरासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. 
 
   
भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावरील मावळा पुतळा ते भुशी धरणापर्यतची रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली असून हा सर्व परिसर नो हाँर्कस झोन घोषित करण्यात आला आहे. तुंगार्ली रोड जवळील पेट्रोलपंप ते अपोलो गँरेज, कुमार चौक ते मावळा पुतळा दरम्यान दुतर्फा नो पार्किंग झोन करण्यात आला असून रस्त्यावर वाहने उभी केल्यास जँमर लावून कारवाई करण्यात येणार आहे. 
   
रायवुड काँर्नर, जकात नाका, कुमार चौक येथे नाकाबंदी व चेकिंग पाँईट नेमत ब्रिथ अँनालायझर मशिनच्या सहाय्याने चालकांची तपासणी, रस्त्यावर वाहने उभी करुन साउंड सिस्टिमच्या आवाजात धिंगाणा घालणार्‍य‍ांवर कारवाई, छेडछाड पथकाद्वारे महिलांची छेड काढणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. भुशी धरण व लायन्स पाँईट परिसरात वाहतुक कोंडीमुळे सायंकाळच्या सत्रात पर्यटक तासनतास वाहतूक कोंडीत आडकून पडतात याकरिता सायंकाळी पाचनंतर धरण परिसरातून पर्यटकांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.