अहमदनगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात सोमवारी कर्जत येथील दुचाकी शोरूमचा व्यवस्थापक, पंच व फोटोग्राफरची साक्ष नोंदविण्यात आली़ कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सोमवारपासून सुनावणी सुरू झाली़ सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ उज्ज्वल निकम यांनी साक्ष घेतल्या़ अत्याचार व खुनाच्या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याने कर्जत येथे दुचाकी खरेदी केली होती़ ती पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर आढळली होती. दुचाकी शोरूमच्या व्यवस्थापकाची साक्ष घेण्यात आली़ शिंदे याला ती दुचाकी ६० हजार रुपयांना विकण्यात आली होती़ (प्रतिनिधी)पुस्तके देण्याची मागणीकोपर्डी खटल्यातील आरोपी नितीन भैलुमे याला बीएस्सीचे पेपर द्यायचे असल्याने कारागृहात अभ्यासासाठी त्याला पुस्तके व जेल मॅनुअल देण्यात यावे, अशी मागणी त्याचे वकील अॅड़ प्रकाश आहेर यांनी न्यायालयाकडे केली़ घटनास्थळावरील पोलिसांकडे असलेले सर्व फोटो देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली़
फोटोग्राफरसह तिघांची साक्ष
By admin | Published: February 14, 2017 3:35 AM