शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

नालेसफाईत तीन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 3:05 AM

एका खासगी ड्रेनेजची सफाई करताना मालवणीत गुरुवारी सकाळी तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी

मुंबई : एका खासगी ड्रेनेजची सफाई करताना मालवणीत गुरुवारी सकाळी तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी लेबर कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहेत.मूर्तीभाई हरिजन (३०), माया हरिजन (२६) व काशी हरिजन अशी या तीन मयत कामगारांची नावे आहेत. मालवणी चर्च परिसरात असलेल्या माणकुबाई हाऊस, राम मंदिर येथील एका चाळीच्या ड्रेनेजच्या सफाईसाठी कंत्राटदाराने त्यांना पाठविले होते. त्यानुसार सकाळी हे तिघे ड्रेनेज सफाईसाठी उतरले होते. काम सुरू असताना साडेनऊच्या सुमारास मूर्तीभाईची तब्येत बिघडली. त्यामुळे कंत्राटदाराने त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मागोमाग माया आणि काशी यांचीही प्रकृती बिघडल्याने ते बेशुद्ध झाले. त्याबाबत अग्निशमन दलाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात पोहोचविले. मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले मास्क, हँडग्लोज हे कंत्राटदाराने त्यांना पुरविले नव्हते. त्याच्या निष्काळजीपणामुळे या तिघांचा बळी गेला. (प्रतिनिधी)