शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

बोगस डॉक्टरला तीन वर्षांची सक्तमजुरी !

By admin | Published: June 14, 2016 7:39 PM

बोगस डॉक्टर शरद लिंबराज साळुंखे (४५) यास महाबळेश्वर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ऑनलाइन लोकमतमहाबळेश्वर, दि. 14- कॅन्सर तसेच एड्सवर आपण उपचार करतो,ह्ण असे सांगून पैसे उकळणारा बोगस डॉक्टर शरद लिंबराज साळुंखे (४५) यास महाबळेश्वर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पाचगणी येथील हनुमान रोड भागात शरद साळुंखे (मूळ रा. हिपारगारावा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) हा २०१२ मध्ये एड्स व कॅन्सरसारख्या आजारांवर उपचार करतो, असे सांगून रुग्णांची फसवणूक करायचा. तीन इंजेक्शन घ्या, असे सांगून प्रत्येक इंजेक्शनचे दहा हजार रुपये घेत होता. शरद साळुंखे याच्याकडे डॉक्टर असल्याचा कोणताही परवाना नसताना उपचाराच्या नावाखाली पैसे उकळत आहे, अशी सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांना माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविली. शरद साळुंखे हा विनापरवाना उपचाराच्या नावाखाली फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागाचे डॉ. हेमंत भोसले यांनी पाचगणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बोकडे व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांनी एक पथक तयार करून साळुंखे याला सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडील स्पिरिट, कापूस, सिरिंज व विविध औषधाच्या बाटल्या, रुग्णांची नोंद असलेली डायरी ताब्यात घेतली होती.