मनोर : ग्रुप ग्रामपंचायत टेण परिसरात येणारा गणेशकर पाडा व इतर ठिकाणी ग्रामपंचायतीचा गलथान कारभार व ग्रामसेविकाचे उडवा उडवीचे उत्तरे यामुळे येथील आदीवासींनी बांधलेली शौचालये गेल्या तीन वर्षापासून अर्धवट आहेत. आदिवासी व मुस्लीम समाजाच्या लाभार्थ्यांना हगणदारी मुक्त करण्यासाठी ही शौचालये मे २०१४ मध्ये मंजूर होऊन काम ही सुरू झाले मात्र ग्रामपंचायतीच्या कामचुकारपणामुळे अनुसया पांडु गणेशकर, नरेश गोविंद दळवी, परशुराम मंगल्या दळवी, मौमुना कासम शेख या लाभार्थ्यांची शौचालये अर्धवट आहेत. गेल्या तीन वर्षापासून प्लास्टर नाही. छतावर पत्रे नाहीत नुसते खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामध्ये सिमेंटची टाकी ठेवण्यात आली आहे. (वार्ताहर)>आम्हाला पैसे दिले असते तर पूर्ण झाली असतीशौचालय बांधण्यासाठी सिमेंट रेती व इतर साहित्य व गवंडी ग्राम पंचायतीने पुरविले आहे. तरी तरी सुध्दा काम अर्धवट राहीले आहे. आमच्या हातात पैसे दिले असते तर आम्ही त्यात थोडी फार भर घालून श्रमदान करून शौचालय पूर्ण केले असते असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. ग्रामसेविका म्हणाल्या की, आम्ही लाभार्थ्यांना शौचालय पूर्ण झाले की १२०००/- (बारा हजार) रूपये देणार होतो. परंतु त्यांनी ती बांधलीच नाहीत.
तीन वर्षे शौचालये अर्धवट
By admin | Published: June 28, 2016 3:16 AM