ठाणे : मुंबईसह विदर्भातील काही भागात मंगळवारी परतीच्या पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील लोकमान्यनगर येथील एअर फोर्सच्या फायरिंग रेंजच्या परिसरात वीज पडून सीआयएसएफचे तीन जवान मृत्युमुखी पडले.यवतमाळमध्ये एका तरुणाचा बळी गेला. येत्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराभारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.मोहम्मद इक्बाल (३२), ज्योतिनाथ (२८), मुकेश कुमार (२८) अशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. तर यवतमाळमध्ये दुचाकीने घरी परतताना वीज कोसळून अजय धनराज चव्हाण (१८) हा जागीच मृत्युमुखी पडला तर बहीण योगिता गंभीर जखमी झाली. गोरेगाव-पिंपळखुटा (ता. दारव्हा) मार्गावर ही दुर्घटना घडली.नाशिक जिल्ह्यात चिंचवड येथे (ता. त्र्यंबकेश्वर) शाळेच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वर्गावर वीज कोसळून दोन शालेय विद्यार्थी जखमी झाले.दिवसभरात पुणे, महाबळेश्वर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये १, अहमदनगर, मालेगावात २१, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशकात २, साताºयात १०, अलिबागमध्ये २०, परभणीत ३३, बुलढाण्यात १७, ब्रम्हपुरीत ८ मिमी पावसाची नोंद झाली.
ठाण्यात वीज पडून तीन जवान मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:59 AM