शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 3:36 AM

संत एकनाथ महाराज मिशन; बारा हजार जणांनी केला अभ्यास

- सुदाम देशमुखअहमदनगर : ‘संस्कृत वाणी देवे केली, तरी पाकृत काय चोरापासूनी जाली’? असा रोखठोक सवाल करणाऱ्या पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी साहित्याचे भांडार समृद्ध करून मराठी भाषेचा गोडवा वाढविला. त्यांच्या नावाने चालविल्या जाणाºया पैठणच्या शांतीब्रह्म संत श्री. एकनाथ महाराज मिशनतर्फे वारकरी संप्रदाय आॅनलाईन परीक्षा (अभ्यासक्रम) हा उपक्रम राबविला जातो. यात आतापर्यंत महाराष्ट्र आणि देशाबाहेरील तब्बल १२ हजार जणांनी सहभाग घेऊन संत साहित्याचा अभ्यास केला आहे.संत एकनाथ महाराजांचे १५ वे वंशज योगिराज महाराज गोसावी यांनी २००६ मध्ये संत एकनाथ महाराज यांच्या नावाने संस्थेची स्थापना करून संकेतस्थळही सुरू केले. यावर संत एकनाथ महाराजांचे सर्व साहित्य पहायला मिळते. नाथ महाराजांचा शांती, समतेचा संदेश सर्वत्र पोहोचविणे, साहित्याचा प्रचार करणे हा मिशनचा उद्देश आहे. गोसावी यांनी महाराष्ट्रातील सर्वच संतांच्या साहित्याचा अभ्यास व्हावा, या उदार हेतूने चार वर्षांपासून मिशनच्या माध्यमातून आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू केला.कुठेही न जाता बसल्या जागेवरून,केवळ मोबाईलचा वापर करून संत साहित्याची आवड असणाºया कोणालाही या अभ्यासक्रमात सहभाग घेता येतो. गेल्या चार वर्षात १२ हजार जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.आॅनलाइन पारायणएकनाथी भागवताचे आॅनलाईन पारायण हा उपक्रमही मिशनतर्फे चालविला जात आहे. सध्या सहा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर दीड हजार जणांनी पारायणात सहभाग घेतला आहे.वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या साहित्याचा समावेश करूनच आॅनलाईन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीने, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाºया मराठीप्रेमींनी, संत साहित्याची आवड असणाºया सर्वांना संतांच्या साहित्याचा अभ्यास व्हावा, याच हेतूने अभ्यासक्रमाची रचना केली आहे. त्यामुळेच आतापर्यंत महाराष्ट्रासह विदेशातील मराठी माणसांनीही अभ्यास पूर्ण केला आहे. -योगिराज महाराज गोसावी,संत श्री एकनाथ महाराज यांचे १५ वे वंशज, पैठण

टॅग्स :marathiमराठीMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन