शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

ठगबाज वासनकर गजाआड

By admin | Published: July 28, 2014 1:36 AM

हजारो ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये गिळंकृत करणाऱ्या वासनकर समूहाचा प्रमूख ठगबाज प्रशांत जयदेव वासनकर (रा. कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) याच्यासह तिघांना आज अखेर गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली.

भाऊ आणि मेव्हण्यालाही अटक : गुन्हेशाखेची कारवाई नागपूर : हजारो ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये गिळंकृत करणाऱ्या वासनकर समूहाचा प्रमूख ठगबाज प्रशांत जयदेव वासनकर (रा. कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) याच्यासह तिघांना आज अखेर गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. नागपुरातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करणाऱ्या वासनकर समूहाचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकर तसेच त्याची पत्नी भाग्यश्री प्रशांत वासनकर व विनय जयदेव वासनकर, मैथिली विनय वासनकर, अभिजित जयवंत चौधरी आणि कुमुद चौधरी तसेच त्यांच्याकडे कर्मचारी म्हणून काम करणारे चंद्रकांत, देवदत्त करडले आणि खापरे या ९ जणांविरुद्ध गुन्हेशाखेने ९ मे रोजी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. या घडामोडीनंतर वासनकरकडे रक्कम अडकलेले हजारो हवालदिल ठेवीदार आपली रक्कम परत मिळावी म्हणून वासनकरच्या कार्यालयात धाव घेत होते. त्यांच्यासोबत वासनकरचे कर्मचारी, दलाल आणि एजंट अत्यंत उर्मटपणे वागत होते. परिणामी वासनकर पीडितांचा आक्रोश सारखा वाढतच चालला होता. गुन्हे दाखल करून अडीच महिने झाले तरी पोलीस वासनकर आणि अन्य आरोपींना अटक करण्याची तसदी घेत नसल्यामुळे सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकमतने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. लोकमतमध्ये ठळकपणे वासनकर समूहाच्या घोटाळ्यांचे आणि पीडितांच्या आक्रोशाचे तसेच पोलिसांच्या अनास्थेचेही वृत्त प्रकाशित होत होते. आजही लोकमतने वासनकरच्या कर्मचाऱ्यांच्या भाईगिरीचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. त्याची पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना यांनी गांभीर्याने दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, गुन्हेशाखेचे उपायुक्त सुनील कोल्हे यांनी वासनकर प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी २ च्या सुमारास गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धाने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वासनकरचे घर गाठले. प्रारंभी महाठग प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजित जयवंत चौधरी या तिघांना अटक केली. इतर आरोेपींनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)लोकमतचा दणका!ठगबाज प्रशांत वासनकर यांनी केलेल्या घोटाळ्याची मालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. वासनकर, त्याचा भाऊ विनय आणि साळा अभिजित चौधरी या तिघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शहरातील आर्थिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. अशा प्रकारे नागरिकांची रक्कम हडपून बसलेल्यांची धावपळही चर्चेला आली. उपराजधानीतील सर्वच स्तरातील शेकडो नागरिकांनी लोकमतमध्ये फोन करून ‘वासनकरला खरेच अटक झाली काय’, अशी विचारणा केली. होय, म्हणताच लोकमतच्याच दणक्यामुळे महाठग आणि त्याचे दोन साथीदार गजाआड झाल्याची भावनाही या सर्वांनी व्यक्त केल्या.