गराडे : येथील श्री नवखंडेनाथदेवाची यात्रा झाली. २५ एप्रिल रोजी कुस्त्यांचा आखाडा झाला. यात २५० मल्लांनी हजेरी लावली. अनेक रंगतदार कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गराडेकर ग्रामस्थांनी रोख बक्षिसे देऊन पैलवानांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते आखाड्यातील शेवटची कुस्ती लावण्यात आली. पुरंदर केसरी रोहित काळे व पुरंदर केसरी अक्षय मोडक यांच्यात अटीतटीची कुस्ती होऊन बरोबरीत सुटली.या आखाड्यात पुरंदर केसरी विजय साबळे, रोहित काळे, कातोबा केसरी आकाश काळे, पुरंदर उपकेसरी रघुनाथ जगताप, बंटी मोडक, सूरज गायकवाड, तुषार वरखडे, अक्षय लिंभोरे, अक्षय कामथे, दत्ता तोरवे, जय घाटे, यश जाधव, कार्तिक भोंडे, गणेश रेडके, नीलेश जगताप, रूपेश कामथे, मोहन तोरवे, भाऊसाहेब नानगुडे, गणेश खोपडे, अक्षय मारणे, दत्ता ठोंबरे, अमोल काकडे, नितीन वालगुडे, मारुती वर्पे, धनंजय मुजुमले, संदीप वालगुडे, बबलू दणके, सचिन थोपटे, सुभाष लोखंडे आदी २५० मल्लांनी सहभाग घेतला. या वेळी संजय जगदाळे, बाळासाहेब रावडे, बबन घाटे, संजय रावडे, नीलेश जगदाळे, विजय ढोणे, सुरेश जगदाळे, योगेश घारे, संजय घारे, भानुदास जगदाळे, उत्तम ढोणे, लक्ष्मण पांढरे, मच्छिंद्र दीक्षित, बाळासाहेब दुरकर, योगेश जगदाळे, बाळासाहेब यादव, सुनील जगदाळे, शरदराव कुंभार, मनोहर तरडे,भरत जगदाळे आदी उपस्थित होते. पंच म्हणून पै. पांडाभाऊ जगदाळे, पै. दिलीप मुलाणी, विजय जगदाळे, दिनकर घारे, विठ्ठल जगदाळे, ज्ञानोबा घारे, विश्वनाथ ढोणे, सोनबा जगदाळे, प्रदीप ढोणे, यांनी काम पाहिले.
गराडे गावात कुस्त्यांचा थरार
By admin | Published: April 27, 2016 1:23 AM